Indigo aircraft seen after making an emergency landing at Ahmedabad Airport following a reported bomb threat, prompting full security inspection.

 

esakal

देश

Indigo Emergency Landing : अहमदाबाद विमानतळावर 'इंडिगो' विमानाचे आपत्कालीन लँडिंग; बॉम्बच्या धमकीने उडाली खळबळ!

Indigo Emergency Landing at Ahmedabad Airport : संशयास्पद वर्तन असलेल्या प्रवाशाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि विमानाची कसून तपासणी केली जात आहे.

Mayur Ratnaparkhe

Indigo emergency landing at Ahmedabad Airport after a bomb threat: अहमदाबाद विमानतळावर मदिनाहून हैदराबादला जाणाऱ्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. बॉम्बच्या धमकीनंतर हे आपत्कालीन लँडिंग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मदिनाहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे एका प्रवाशाने संशयास्पद वर्तन केल्यामुळे अहमदाबाद विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच, पोलिस आणि सुरक्षा दल तत्काळ विमानतळावर पोहोचले, त्यांनी विमानातील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले आणि चौकशी सुरू करण्यात आली.

संशयास्पद वर्तन असलेल्या प्रवाशाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि विमानाची कसून तपासणी केली जात आहे. या प्रकरणात पोलिस कारवाई सुरू असल्याची पुष्टी झोन ​​४ चे डीसीपी अतुल बन्सल यांनी केली.

इंडिगोची पॅरेंट कंपनी इंटरग्लोब एव्हिएशनच्या (InterGlobe Aviation) शेअरमध्ये गुरुवारी (5 डिसेंबर) सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण झाली. निफ्टीवर हा शेअर जवळपास 3 टक्के घसरला. बुधवारी इंडिगोच्या सुमारे 200 फ्लाइट्स रद्द झाल्यानंतर शेअरमध्ये ही घसरण दिसली. गेल्या काही वर्षांतील इंडिगोसाठीची ही सर्वात मोठी ऑपरेशनल अडचण मानली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune-Nashik Railway : रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती: पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होणार; पहिल्या टप्प्यात ८,९७० कोटींचा खर्च

Excise Law: सिगारेटसह पान मसाल्याच्या किमती वाढणार! लोकसभेत मोठा निर्णय; हे विधेयक का आणले गेले?

Latest Marathi News Live Update : पनवेलजवळ मालगाडीचे रुळावरून घसरण्याचे प्रकरण!

Malegaon News : घरकुल लाभार्थ्यांचे सुमारे सहा कोटी रुपये थकले; प्रधानमंत्री आवास योजनेचे अनुदान हिशोब विभागाच्या दिरंगाईमुळे रखडले

Viral Video: 'सनम तेरी कसम...' गाण्यावर डान्स करणाऱ्या नव वधु-वराचा व्हिडिओ तुफान व्हायरल, यूजर्सच्या मजेदार कमेंटचा पाऊस

SCROLL FOR NEXT