Asaduddin Owaisi
Asaduddin Owaisi esakal
देश

'मुस्लिमांच्या घरांची तोडफोड, जहांगीरपुरीत अत्याचार'; भाषणादरम्यान ओवैसींना आलं रडू

सकाळ डिजिटल टीम

सध्या देशभरात मुस्लिमांवरील अत्याचारात वाढ होऊ लागलीय.

Asaduddin Owaisi Emotional Speech : सध्या देशभरात मुस्लिमांवरील (Muslim) अत्याचारात वाढ होऊ लागलीय. त्यातच हनुमान चालिसा, मशिद भोंगा वाद देखील खूप गाजत आहे. मुस्लिमांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचाराबाबत ओवैसींनी दु:ख व्यक्त केलंय. AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) हैदराबादमध्ये (Hyderabad) नमाजानंतर भावूक झाले आणि भाषणादरम्यान त्यांना रडू कोसळलं.

भाषणादरम्यान ओवैसी म्हणाले, खरगोनमध्ये (Khargone) मुस्लिमांच्या घरांची तोडफोड करण्यात आली. जहांगीरपुरीत मुस्लिमांवर अत्याचार झाले, त्यांची दुकानं उद्ध्वस्त करण्यात आली, यामुळं खूप दु:ख होत आहे. पण, आम्ही अत्याचार कदापि सहन करणार नाही. कारण, आम्ही मृत्यूला घाबरत नाही. तुमच्या राजवटीलाही घाबरणार नाहीय. यापुढं आम्ही संयमानं काम करू, पण मैदान सोडणार नाही, असा इशारा ओवैसींनी दिलाय.

नुकतेच राजस्थानमधील (Rajasthan) अलवर येथील 300 वर्षे जुनं मंदिर पाडल्याप्रकरणी ओवैसी यांनी भाजपला चांगलंच घेरलंय. असदुद्दीन ओवैसींनी ट्विटद्वारे लिहिलंय की, राजस्थानातील राजगढमधील प्राचीन मंदिर पाडणं हा भाजपशासित महापालिका मंडळाचा निषेधार्ह निर्णय आहे. आम्ही सर्व धर्मांच्या धर्म स्वातंत्र्यावर विश्वास ठेवतो, पण हे गंभीर उल्लंघन आहे. सर्व प्रार्थनास्थळांवर झालेल्या हल्ल्याबद्दल भाजप-आरएसएस माफी मागतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केलीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता मसाल्यातही भेसळीची फोडणी! लाकडाचा भुसा, Acid चा वापर; १५ टन बनावट मसाला जप्त

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT