Hindu Woman Aruna Upadhyay esakal
देश

MIM च्या तिकिटावर हिंदू महिलेनं जिंकली निवडणूक; भाजपला चारली धूळ

'पक्षप्रमुख ओवैसींच्या संविधान आणि कायदा समानतेबद्दलच्या वक्तव्यानं मी प्रभावित झालेय.'

सकाळ डिजिटल टीम

'पक्षप्रमुख ओवैसींच्या संविधान आणि कायदा समानतेबद्दलच्या वक्तव्यानं मी प्रभावित झालेय.'

खरगोन : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीननं (AIMIM) मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) प्रथमच शहरी संस्थांच्या निवडणुका लढवल्या. यात बुधवारी जाहीर झालेल्या निकालांमध्ये MIM च्या तीन नगरसेवकांचा विजयही झालाय. नागरी संस्थांच्या निवडणुकीत एआयएमआयएमच्या विजयी नगरसेवकांची संख्या सात झालीय. या तीन जागा खरगोन नगरपालिकेच्या आहेत.

या नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मधून MIM उमेदवार अरुणाबाई उपाध्याय यांनी भाजप (BJP) उमेदवार सुनीता देवी यांचा 31 मतांनी पराभव केला. AIMIM उमेदवार शकील खान यांनी प्रभाग क्रमांक 15 मधून अपक्ष उमेदवार आसिफ खान यांचा 662 मतांनी पराभव केला. तर, प्रभाग क्रमांक 27 मधून एआयएमआयएमच्या उमेदवार शबनम अदीब यांनी अपक्ष उमेदवार शकीला खान यांचा 774 मतांनी पराभव केलाय.

नवनिर्वाचित नगरसेविका अरुणा उपाध्याय यांनी सांगितलं की, प्रभागातील बंधुभाव आणि मतदारांचा हा विजय आहे. पक्षप्रमुख ओवैसींच्या संविधान आणि कायदा समानतेबद्दलच्या वक्तव्यानं मी प्रभावित झालेय. त्यामुळंच मी या पक्षाकडून निवडणूक लढवण्याचा विचार केला. माझा हा विजय मानवतेचा विजय असल्याचंही त्या म्हणाल्या. अरुणा यांनी प्रभाग क्रमांक 1 मधून 31 मतांनी निवडणूक जिंकत भाजप, काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांचा पराभव केला. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी पक्षाच्या उमेदवारांच्या बाजूनं खंडवा इथं जाहीर सभा घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

Video: D Gukesh विरुद्ध विजय मिळवताच नाकामुरानं 'किंग' प्रेक्षकांमध्ये फेकला, अमेरिकन खेळाडूच्या सेलिब्रेशनवरून वाद

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

SCROLL FOR NEXT