Israel-Palestine 
देश

Israel-Palestine: महात्मा गांधी म्हणाले होते, पॅलेस्टाईन...; ओवेसींनी आठवण करुन दिली भारताची भूमिका

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- इस्राइल आणि पॅलेस्टाईनमधील हमास या अतिरेकी संघटनेमध्ये संघर्ष सुरु आहे. हमासच्या अतिरेक्यांनी ७ ऑक्टोंबर रोजी इस्राइलवर हल्ला केला होता. त्यानंतर इस्राइलने प्रतिहल्ला केला असून गाझा पट्टीमध्ये विध्वंस सुरु केला आहे. या संघर्षामध्ये भारताने आधी हमास दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा निषेध केला होता. असे असले तरी केंद्र सरकारकडून द्विराष्ट्र सिद्धांताला पाठिंबा असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी याच विषयावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, 'मला देशातील जनतेला सांगायचंय, महात्मा गांधी म्हणाले होते की पॅलेस्टाईन हे अरबांचे राष्ट्र आहे. जसं इंग्लंड इंग्रजांचा आणि फ्रान्स फ्रान्सच्या लोकांचा आहे. तसाच पॅलेस्टाईन हा अरबांचा आहे.' ओवेसी यांनी राजस्थानमध्ये पत्रकारांची संवाद साधत असताना प्रतिक्रिया दिली.

पॅलेस्टाईन हा स्वतंत्र देश असायला हवा. गेल्या ८० वर्षात इस्राइलने पॅलेस्टाईनचा भूभाग ताब्यात घेतला आहे हे मला भारतीयांना लक्षात आणून द्यायचंय, असं ओवेसी म्हणाले. ओवेसी यांनी इस्राइलने गाझा पट्टीमध्ये सुरु केलेल्या विध्वंसाचा निषेध केला आहे. इस्राइलने तात्काळ हल्ले थांबबावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.

हमासच्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निषेध केला होता. गेल्या काही वर्षांच्या काळात भारत आणि इस्राइलचे संबंध सुधारले आहेत. त्यामुळे भारताने आतापर्यंत द्विराष्ट्रवादाला दिलेल्या पाठिंब्यावर शंका घेतल्या जात होत्या. त्यानंतर काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी पॅलेस्टाईनच्या अध्यक्षांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून मानवतावादी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे भारत सरकार द्विराष्ट्र सिद्धांताला आजही पाठिंबा देतो हे स्पष्ट झालं.

दरम्यान, पॅलेस्टाईनचा स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळावी यासाठी लढा सुरु आहेत. पॅलेस्टाईनच्या अनेक भागांवर इस्राइलचा ताबा आहे. अरबांनी कायम पॅलेस्टाईनला पाठिंबा दिलाय. तसेच अमेरिका, इंग्लडसारख्या देशांनी दोन्ही देशांचे अस्तित्व मान्य केलं आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP vs Shivsena: शिंदेंना घरातच घेरण्याची भाजपची रणनीती, अंतर्गत बदल्याच्या राजकारणाने मोठी खळबळ! शिंदेसेनेचा कट्टर विरोधक निवडणूक प्रभारी

Maharashtra Government : राज्यात स्थापन होणार ‘शहरी आरोग्य आयुक्तालय’, शहरांतील आरोग्य सेवेला मिळणार नवे बळ

Latest Marathi Live Update News: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आमरण उपोषण सुरू

प्रेमाच्या हळव्या भावनांना स्पर्श करणारं 'सावरताना...' गाणं प्रदर्शित; मुक्ता-सचितच्या केमिस्ट्रीवर प्रेक्षक फिदा

भाईजानचा नवा अवतार! सलमान साकारणार छत्रपतींचा विश्वासू जीवा महाला

SCROLL FOR NEXT