aimim leader akbaruddin owaisi acquitted in two hate speech cases  
देश

चिथावणीखोर भाषण प्रकरणी अकबरुद्दीन ओवैसी दोषमुक्त

सकाळ डिजिटल टीम

हैदराबादमधील नामपल्ली महानगर न्यायालयातील खासदार/आमदारांसाठीच्या विशेष सत्र न्यायालयाने बुधवारी तेलंगणा विधानसभेतील एआयएमआयएम(MIM) चे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांची निर्मल आणि निजामाबाद जिल्ह्यांशी संबंधित दोन द्वेषपूर्ण भाषण प्रकरणात निर्दोष मुक्तता केली. त्यासाठी योग्य पुरावे सादर करण्यात फिर्यादी अयशस्वी ठरल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. अकबरुद्दीन यांनी भविष्यात राष्ट्रीय अखंडता लक्षात घेऊन कोणतेही वादग्रस्त भाषण करू नये, असे निर्देशही दिले आहेत.

डिसेंबर 2012 मध्ये तेलंगणातील निजामाबाद आणि निर्मल येथे कथित द्वेषयुक्त भाषणे केल्याबद्दल अकबरुद्दीन यांच्यावर खटले चालू होते. या दरम्यान मंगळवारी विशेष न्यायालयाने या दोन्ही प्रकरणातील निकाल बुधवारपर्यंत राखून ठेवला होता. बचाव पक्ष आणि फिर्यादीचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी हे प्रकरण निकालासाठी ठेवण्यात आले होते आणि निकाल बुधवारपर्यंत पुढे ढकलला होता.

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल-मुस्लिमीन (AIMIM) प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांचे धाकटे भाऊ अकबरुद्दीन यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या काही कलमांतर्गत द्वेषपूर्ण भाषणे केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्यामध्ये त्यांनी सार्वजनिक भाषणादरम्यान एक समुदायाविरोधात प्रक्षोभक आणि अपमानास्पद भाषा वापरली.

यापूर्वी, अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर 8 डिसेंबर 2012 रोजी निजामाबादमध्ये आणि 22 डिसेंबर 2012 रोजी निर्मल शहरात कथित द्वेषयुक्त भाषण केल्याप्रकरणी अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते.

त्यांना अटकही झाली आणि नंतर जामिनावर सुटका झाली. गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) निजामाबाद प्रकरणाचा तपास करून 2016 मध्ये आरोपपत्र दाखल केले, तर निर्मल प्रकरणाचा तपास करणाऱ्या जिल्हा पोलिसांनीही त्याच वर्षी आरोपपत्र सादर केले. निजामाबाद प्रकरणात एकूण 41 साक्षीदार तपासण्यात आले, तर निर्मल प्रकरणात 33 साक्षीदार तपासण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT