Indigo Airlines
Indigo Airlines esakal
देश

IndiGo Airlines : दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या IndiGo विमानात एअर होस्टेसचा विनयभंग; पायलटला मारहाण

सकाळ डिजिटल टीम

दिल्लीहून पाटण्याला जाणाऱ्या 'इंडिगो'च्या विमानात (Indigo Airlines) एअर होस्टेससोबत (Air Hostess) विनयभंग झाल्याची घटना समोर आलीये. बिहारमधील (Bihar) तीन प्रवाशांनी दारूच्या नशेत एअर होस्टेससोबत ही घटना घडवली.

यादरम्यान त्यांनी गोंधळ घातला आणि फ्लाइट कॅप्टनलाही मारहाण केल्याचा आरोप आहे. तिघंही स्वत:ला बिहारमधील सत्ताधारी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या जवळचे असल्याचे सांगत होते. ही घटना गेल्या रविवारी रात्री घडलीये.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दारू पिऊन IndiGo फ्लाइट 6E-6383 मध्ये चढले. रात्री 10 वाजता दिल्लीहून पाटण्याला पोहोचल्यानंतर दोघांना विमानतळाच्या आत अटक करण्यात आली. सीआयएसएफनं नितीन आणि रोहितला पकडून विमानतळ पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिलं, तर पिंटू नावाचा तरुण फरार आहे. आरोपींची ब्रेथ अॅनालायझर चाचणी करण्यात आली असून, त्यात त्यांनी मद्यपान केल्याची पुष्टी झालीये. तिघंही वैशाली येथील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे.

इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत पोलिसांकडं लेखी तक्रार केलीये. विमानतळ पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू आहे. असं सांगितलं जातंय की, विमानानं दिल्लीहून बिहारला उड्डाण केलं, तेव्हा आरोपींनी अचानक गोंधळ सुरू केला. हा गोंधळ पाहून एअर होस्टेस त्यांना समजावायला गेली. मात्र, आरोपींनी तिलाही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी विमानाच्या पायलटलाही मारहाण करण्यात आली. यानंतर विमानाच्या पायलटनं फोन करून संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, तर सोलापुरातील दोन गावांचा मतदानावर बहिष्कार

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT