An Air India aircraft stationed on the runway after a fuel control switch malfunction was detected, leading to an immediate halt of the flight for safety inspection.

 

esakal

देश

Air India Flight Grounded : 'एअर इंडिया'च्या विमानात फ्यूल कंट्रोल स्विचमध्ये बिघाड!, उड्डाण ऐनवेळी थांबवले

Air India Flight Fuel Control Switch Issue: गेल्या वर्षी अहमदाबादमध्ये क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानातही फ्यूल स्विचमध्ये बिघाड झाला होता.

Mayur Ratnaparkhe

Air India aircraft stationed on the runway after a fuel control switch malfunction : लंडनहून बंगळुरूला जाणारे एअर इंडियाचे बोईंग 787-8 हे विमान टेकऑफच्या अगदी आधी थांबवले गेले. कारण, पायलटला त्या विमानाच्या फ्यूल कंट्रोल स्विचमध्ये बिघाड जाणवला. ज्यामुळे  या विमान ग्राउंड करण्यात आले आणि उड्डाण थांबवावे लागले.

यासंदर्भात एअर इंडियाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आज हीथ्रोहून बंगळुरूला जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI 132 या विमानात इंजिन सुरू होताना, डाव्या इंजिनवरील फ्यूल कंट्रोल स्विच दोनदा RUN स्थितीत राहिले नाही आणि ते पुन्हा CUTOFF स्थितीत आले. त्यामुळे, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विमान ग्राउंड करण्यात आले.

याशिवाय, एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, "आमच्या एका वैमानिकाने बोईंग 787-8 विमानाच्या फ्यूल कंट्रोल स्विचमध्ये संभाव्य बिघाड झाल्याची तक्रार केली असल्याची आम्हाला माहिती मिळाली. या माहितीनंतर, आम्ही संबंधित विमान ग्राउंड केले आणि पायलटच्या शंका प्राधान्याने तपासण्यासाठी OEM ला नियुक्त केले. ही बाब  डीजीसीए यांना देखील कळवण्यात आली आहे.

डीजीसीएच्या निर्देशानंतर, एअर इंडियाने त्यांच्या ताफ्यातील सर्व बोईंग 787-8 विमानांवरील फ्यूल कंट्रोल स्विचची तपासणी केली आणि त्यांना कोणतीही समस्या आढळली नाही. आमच्या प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा एअर इंडियामध्ये सर्वोच्च प्राधान्य आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Transaction: अखेर संभ्रम संपला! यूपीआय व्यवहारांवर शुल्क लागणार का? केंद्र सरकारनं स्पष्ट उत्तर दिलं, महत्त्वाची माहिती समोर

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या हत्येच्या कटाप्रकरणी अमोल खुणेला जामीन; धनंजय मुंडेंसोबत बोलणं झालं होतं का?

Viral Video: जत्रेतल्या पाळण्यावर तरुणाचा जीवघेणा स्टंट पाहून तुम्हीही व्हाल थक्क, पाहा व्हायरल व्हिडिओ

ATM Firing Incident :'एटीएम'बाहेरच तरूण व्यावसायिकावर गोळीबार; सहा लाखांची रोकड अन् दुचाकीही पळवली

Latest Marathi News Live Update: मालेगाव महापालिकेत मोठा राजकीय ट्विस्ट, भाजपची अचानक माघार

SCROLL FOR NEXT