Air India aircraft at Jaipur Airport where a potential aviation mishap was averted after a technical alert, ensuring passenger safety.

 

esakal

देश

Plane Accident Averted : विमान दुर्घटना टळली! पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा थोडक्यात बचावले

Air India Flight Incident at Jaipur Airport : एअर इंडियाच्या विमानाचे पहिल्या प्रयत्नात अयशस्वी लँडिंग झाले नंतर मग...

Mayur Ratnaparkhe

plane accident averted at jaipur : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज (बुधवार) बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. या भीषण अपघातात अजित पवारांसह विमानातील सर्व पाच जणांचा मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे.

एकीकडे ही दु:खद घटना घडलेली असताना, दुसरीकडे जयपूरमध्येही एअर इंडियाच्या एका विमानाचे यशस्वी लँडिंग होवू शकले नाही. या विमानात पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि राजस्थानचे काँग्रेस प्रभारी सुखजिंदर सिंग रंधावा होते.  विमान दिल्लीहून जयपूरला जात होते.

एअर इंडियाचे विमान एआय-१७१९ ने दुपारी साधारण एक वाजता जयपूर विमानतळावर लँडिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, धावपट्टीवर उतरताच लँडिंग अयशस्वी झाले. यामागे धावपट्टीची परिस्थिती किंवा तांत्रिक बिघाड हे कारण दिले जात आहे. पहिल्या प्रयत्नात विमान अस्थिर असल्यामुळे उतरले नाही, त्यामुळे धावपट्टीला स्पर्श केल्यानंतर पायलटने लगेचच आणखी एक फेरी मारली. दहा मिनिटे चक्कर मारल्यानंतर, दुसऱ्या प्रयत्नात विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले. विमानात असलेले सुखविंदर सिंग रंधावा यांच्यासह सर्वजण सुरक्षित आहेत.

गो-अराउंड म्हणजे काय? -

विमानतळ सूत्रांनी सांगितले की, अशी परिस्थिती उड्डाण सुरक्षा मानकांमध्ये पूर्णपणे बसते. जर पायलटला कोणत्याही टप्प्यावर लँडिंग असुरक्षित वाटत असेल, तर तो विमान पुन्हा हवेत उचलण्याचा निर्णय घेऊ शकतो, ही प्रक्रिया गो-अराउंड म्हणून ओळखली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री अजित पवारांना राज्यपालांनी वाहिली श्रद्धांजली

Ajit Pawar: अजित पवारांच्या विमान अपघाताची बातमी पहिल्यांदा कशी आणि कुणाला समजली? राजेश टोपेंनी संपूर्ण घटनाक्रमच सांगितला!

Ajit Pawar Death News LIVE Updates : अजित पवारांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन कुठं अन् कधी घेता येणार?

Numerology Prediction : 'या' 3 मूलांकांच्या लोकांना अपघाताचा धोका जास्त असतो, यात तुमचा मूलांक आहे का? सुरक्षिततेचा उपायही पाहा

Truck Bullockcart Accident : ऊसतोडीला जाताना बैलगाडीला ट्रकने उडविले; वडील ठार, मुलगा व इतर बैलगाडीतील कामगार जखमी

SCROLL FOR NEXT