Air India 
देश

Air India : प्रिय प्रवाशांनो! पहिल्या उड्डाणापूर्वी टाटाचा खास संदेश

दिल्ली ते मुंबई फ्लाइटमध्ये हिंदी आणि इंग्रजी या भाषेत हा संदेश प्रवाशांसाठी देण्यात आला.

निनाद कुलकर्णी

नवी दिल्ली : सुमारे 69 वर्षांनंतर गुरुवारी एअर इंडियाची मालकी टाटा समूहाकडे (TATA Group) सोपविण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी या विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी टेक ऑफ पूर्वी एक विशेष ऑडिओ (Audio Announcement In Flight) संदेश सादर करण्यात आला. एअर इंडियाने दिल्ली ते मुंबई या दरम्यान, फ्लाइट क्रमांक AI-665 वर हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत हा संदेश प्रवाशांसाठी सादर केला. (Air India Special Audio Announcement For Flyers)

काय होता संदेश

"गुड मॉर्निंग... या ऐतिहासिक फ्लाइटमध्ये आपले स्वागत आहे, आज सात दशकांनंतर, एअर इंडिया अधिकृतपणे पुन्हा टाटा समूहाचा भाग बनले आहे. आम्ही तुम्हाला या आणि एअर इंडियाच्या प्रत्येक फ्लाइटमध्ये सेवा देण्यासाठी उत्सुक आहोत. एअर इंडियाच्या भविष्यात आपले स्वागत आहे! आम्ही आशा करतो की तुम्ही प्रवासाचा आनंद घ्याल. धन्यवाद," अशा आशयाचा संदेश विमान उड्डणापूर्वी प्रवाशांसाठी देण्यात आला. (Air India Officially Handed over To TATA Group )

दरम्यान, वित्त मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, टाटा सन्सची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या टॅलेस प्रायव्हेट लिमिटेडकडून सरकारला 2,700 कोटी रुपये मिळाल्याने एअर इंडियाचा धोरणात्मक निर्गुंतवणूक व्यवहार पूर्ण झाला असल्याचे गुरुवारी जाहीर केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT