Air India  Sakal
देश

Air India Urination Case : विमानातील लघुशंका प्रकरणात महुआ मोईत्रांची मोठी मागणी

26 नोव्हेंबरला आरोपी शंकर मिश्रा याने एअर इंडियाच्या न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइटमध्ये सहप्रवासी महिलेच्या अंगावर लघुशंका केली होती.

सकाळ डिजिटल टीम

Air India Urination Case : एअर इंडियाच्या विमान प्रवासात सहप्रवाशावर लघुशंका केल्याचा वाद काही केल्या संपण्याचं नाव घेताना दिसत नाहीये.

हे ही वाचा : पुण्याचा पहिला 'माॅल'- तुळशीबाग

काही दिवसांपूर्वी तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रांनी उडी घेतली होती. त्यानंतर आता त्यांनी या प्रकरणात कारवाईबाबत नवी मागणी केली. त्यामुळे हा वाद अधिक पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लघुशंका करणाऱ्या शंकर मिश्रा यांच्या वकिलांनी कोर्टात मिश्रा यांनी संबंधित महिलेवर लघुशंका केले नव्हती तर, पीडित महिलेने स्वतःहाच तिच्या सीटवर लघूशंका केली होती, असा दावा केला होता.

मिश्रांच्या या दाव्यानंतर मोईत्रांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मिश्रा यांच्या वकिलांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मोईत्रा म्हणाल्या की, "शंकर मिश्रा यांच्या वकिलाचा दावा हा कायदेशीर इतिहासातील सर्वात विक्षिप्त बचाव केलाला दावा आहे. सहप्रवाशावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे दाखल आरोपांनुसार खटला पुढे चालणे गरजेचे असल्याचे ट्वीटमध्ये म्हटले आहे.

मात्र, काहीवेळातच मोईत्रांनी केलेले हे ट्वीट त्यांनी काही वेळातच डिलीट केले. मिश्रा यांच्या दाव्यावर पीडित महिलेसह अनेक कथ्थक नृत्यांगणांनी नाराजी व्यक्त केली आहे.

26 नोव्हेंबरला आरोपी शंकर मिश्रा याने एअर इंडियाच्या न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइटमध्ये सहप्रवासी महिलेच्या अंगावर लघुशंका केली होती. त्यानंतर मिश्रा विरोधात ४ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करत ६ जानेवारीला त्याला बेंगळुरू येथून अटक करण्यात आली. सध्या मिश्रा १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Rate : शेतकऱ्यांना दिलासा! पुणे जिल्हा दूध संघाकडून दूध खरेदी दरात वाढ

Thane Water Scarcity: ऐन गणेशोत्सवात ठाण्यात पाणी संकट, पाणी पुरवठ्यात २५ ते ३० टक्के घट

Latest Maharashtra News Updates: पीएमपी चालकाला ह्रदयविकाराचा झटका, लक्ष्मी रस्त्यावरील घटना

Himachal Pradesh man carries wife’s body : डोळ्यात अश्रू अन् पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन ‘तो’ तब्बल १८ तास ३५ किमी चालला!

Future Fab Four: भविष्यातील 'फॅब फोर'मध्ये दोन भारतीय, पण ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूला संधी नाही!

SCROLL FOR NEXT