Kargil airstrip in the night
Kargil airstrip in the night 
देश

Video: पहिल्यांदाच कारगिल हवाई पट्टीवर रात्रीच्यावेळी उतरले एअरक्राफ्ट; हवाई दलाची मोठी कामगिरी

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- भारताच्या हवाई दलाचे C-130J एअरक्राफ्ट पहिल्यांदाच कारगिल हवाई पट्टीवर रात्रीच्या वेळी उतरले आहे. हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचं बोललं जातंय. एअरक्राफ्टच्या लँडिंगचा व्हिडिओ पीटीआयकडून शेअर करण्यात आला आहे. (In at, a C-130J aircraft of the Indian Air Force recently landed at the Kargil airstrip in the night for the first time)

रात्रीच्या लँडिंगचा व्हिडिओ शेअर करत आयएएफने म्हटलंय की, 'पहिल्यांदाच C-130J एअरक्राफ्टने रात्रीच्यावेळी कारगिल हवाई पट्टीवर लँडिंग केले. हा एक प्रशिक्षणाचा भाग होता.' कारगिल परिसरात सैन्य आणि शस्त्रास्त्र तात्काळ पोहोचवण्यासाठी याचा उपयोग होईल असं सांगितलं जातं. या ऑपरेशबाबत भारतीय हवाई दलाने अधिक माहिती दिलेली नाही.

मागील महिन्यात, उत्तराखंडमध्ये उतरण्यासाठी कठीण असलेल्या हवाई पट्टीवर आयएएफने दोन C-130J-30 उतरवले होते. उत्तराखंडच्या बोगद्यामध्ये अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी महत्वाची यंत्र सामुग्री या एअरक्राफ्टच्या मदतीने उतरवण्यात आली होती. तसेच, मागील वर्षी आयएएफने हेच एअरक्राफ्ट सुदानमध्ये एका महत्त्वाच्या मिशनसाठी वापरले होते.

कारगिल हवाई पट्टी ही दुर्गम आहे. हिमालयाच्या पर्यतरांगांवर ८,८०० फूटावरील कारगिल हवाई पट्टीवर एअरक्राफ्ट उतरवणे कठीण असते. समुद्रसपाटीपासून उंच, प्रतिकूल परिस्थितीत विमान उतरवण्यासाठी वैमानिकाकडे विशेष कौशल्य असणे आवश्यक असते. त्यामुळे भारतीय वैमानिकांनी हे अवघड काम करुन दाखवले आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT