Team eSakal Team eSakal
देश

देशांतर्गत विमानसेवा पूर्ण क्षमतेनं होणार सुरू; नवी नियमावली जाहीर

कोरोना महामारीनंतर प्रथमच हवाई वाहतुकीच्या प्रवाली क्षमतवरील निर्बंध हटवण्यात येत आहे.

सुधीर काकडे

कोरोना महामारीच्या काळात लावण्यात आलेले हवाई वाहतुकीवरील निर्बंध आता हळू हळू हटवण्यात येत आहेत. त्यानुसार आता 18 ऑक्टोबरपासून विमान कंपन्या कोणत्याही बंधनाशिवाय देशांतर्गत उड्डाणं करू शकणार आहेत. नागरी उड्डयन मंत्रालयाने मंगळवारी हवाई प्रवासासाठी प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन ही घोषणा केली आहे.

कोरोना महामारीच्या काळात पुर्णपणे बंद करण्यात आलेली हवाई वाहतूक व्यवस्था आता पुर्ववत झाली आहे. त्यानुसार आता 85 टक्के प्रवासी क्षमतेची मर्यादा 18 ऑक्टोबरनंतर नसणार आहे. त्यामुळे हवाई पुन्हा एकदा विमानं पुर्ण क्षमतेनं उड्डाण करू शकणार आहेत.

दरम्यान, कोरोना महामारीनंतर परिस्थिीती लक्षात घेऊन निर्बंध कमी करण्यात आले आहेक. त्यानुसार 1 जुन ते 5 जुलैदरम्यान 50 टक्के प्रवासी क्षमतेने वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर ५ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान ती 65 टक्के करण्यात आली, तर 12 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर दरम्यान ती 72.5 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली होती. त्यानंतर सध्या म्हणजेच 18 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर पर्यंत 85 टक्के प्रवाशांसह विमानं देशांतर्गत उड्डाणं घेत होती, तर आता या प्रवासावरील पूर्ण प्रवासी मर्यादा काढून टाकण्यात आल्याचे देशाच्या नागरी उड्डयण मंत्रालयाने सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'ची दादागिरी संपणार? पुतीन यांची भारताला मोठी ऑफर! दोन्ही देशांना सापडला नवा व्यापारी मार्ग

Charas Seized : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक कोटींचे चरस जप्त; बँकॉकहून आलेल्या महिला प्रवाशाकडून कॉस्मेटिकच्या डब्यांतून तस्करी

Lohgaon News : लोहगाव अत्याचार प्रकरण; आरोपीला कठोर शिक्षेची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

Nagpur Crime : अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून; आरोपीला अटक, दोन महिन्यांपूर्वी आला होता कारागृहातून सुटून

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

SCROLL FOR NEXT