ajit pawar says Kashmir files will not be tax free in maharashtra center should reduce tax across country  Sakal media
देश

'द काश्मिर फाईल्स' महाराष्ट्रात करमुक्त नाहीच; अजित पवार म्हणाले..

सकाळ डिजिटल टीम

'द काश्मिर फाईल्स' या चित्रपटाची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. देशभरात उत्तर प्रदेश, बिहारसह अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही चित्रपट करमुक्त करण्याची मागणी भाजपने केली आहे. मात्र सध्या हा चित्रपट राज्यात करमुक्त केला जाणार नसल्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चित्रपट करमुक्त करण्याची भाजपची ही मागणी बुधवारी फेटाळून लावली आणि केंद्राने कर सवलत दिल्यास सर्व राज्यांनाही ती लागू होईल, असे सांगत केंद्राच्या कोर्टात चेंडू टाकला. ते राज्य विधानसभेत 2022-23 च्या वार्षिक अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देत होते.

महाराष्ट्रात यापूर्वी ‘मिशन मंगल’, ‘तानाजी’ आणि ‘पानिपत’ या चित्रपटांना करसवलत देण्यात आली होती, याची आठवण पवार यांनी यावेळी करून दिली. तसेच त्यांनी "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मिर फाईल्सचा विशेष उल्लेख केला. जर निर्णय घेतला गेला तर तो संपूर्ण देशाला लागू होईल, अगदी जम्मू आणि काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत चित्रपट करमुक्त असेल," असे ते यावेळी म्हणाले.

या दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'द काश्मिर फाईल्स' करमुक्त करण्याची घोषणा केली होती. त्याचप्रमाणे गोवा, मध्य प्रदेश, कर्नाटक, हरियाणा आणि गुजरात या भाजपशासित राज्यांनी हा चित्रपट करमुक्त केला आहे. विवेक अग्नहोत्री यांनी दिगदर्शीत केलेला काश्मिर फाईल्स यामध्ये अनुपम खेर आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या भूमिका आहेत. याशिवाय या चित्रपटात पल्लवी जोशी, दर्शन कुमार, चिन्मय मांडलेकर, पुनीत इस्सर, भाषा सुंबळी यांसारखे कलाकार आहेत. चित्रपटातील अनुपम खेर यांच्या अभिनयाचे सध्या सर्वांकडून कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT