Cleric Mohammad Tahir Esakal
देश

Ajmer Cleric: आधी झोपेच्या गोळ्या दिल्या अन् नंतर... लैंगिक शोषणाला कंटाळलेल्या सहा अल्पवयीन मुलांनी मौलवीला संपवले

Ajmer Cleric Murder Case: पोलिसांनी सांगितले की, अल्पवयीन मुलांनी ताहिरच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या आणि नंतर त्याला काठीने मारहाण केली.

आशुतोष मसगौंडे

राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील रामगंज भागात एका मशिदीच्या मौलवीच्या हत्येप्रकरणी सहा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. यावेळी मुलांनी सांगितले की, मौलवीने त्यांचे लैंगिक शोषण केले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मोहम्मद ताहीर (30) याची 26 एप्रिलच्या रात्री बेदम मारहाण करत हत्या करण्यात आली होती. (Ajmer Cleric Murder Case)

पोलिस अधीक्षक (अजमेर) देवेंद्र विश्नोई म्हणाले की, मशिदीत त्याच्यासोबत राहणाऱ्या सहा अल्पवयीन मुलांची चौकशी राहिल्यामुळे तपास रखडला होता. मौलवी त्यांचे लैंगिक शोषण करत असल्याने त्यांनी खून केल्याची कबुली दिली आहे. अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.

पोलिसांनी सांगितले की, अल्पवयीन मुलांनी ताहिरच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या आणि नंतर त्याला काठीने मारहाण केली. नंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली की, मास्क घातलेले तीन पुरुष मशिदीत घुसले आणि मौलवीवर हल्ला केला.

अजमेर पोलिसांच्या विशेष पथकासाठी हे प्रकरण एक आव्हान होते कारण शेकडो सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आणि उत्तर प्रदेशातील ताहिरची 8 वर्षांची पार्श्वभूमी तपासल्यानंतरही या प्रकरणात काहीही निष्पन्न होत नव्हते. परंतु, आम्ही विद्यार्थ्यांना विश्वासात घेतले त्यानंतर मुलांनी सर्व घटनाक्रम उघड केला, असे पोलीस अधिक्षक विश्नोई म्हणाले.

बिश्नोई म्हणाले, मदरशातील एका विद्यार्थिनीचे ताहिरने लैंगिक शोषण केले होते. जेव्हा विद्यार्थाने हा प्रकरा उघड करण्याची धमकी दिली तेव्हा ताहिरने त्याला पैशाचे आमिष दाखवले.

पुढे ताहिरच्या सततच्या छळाला कंटाळून विद्यार्थ्यांनी माहिरचा खून करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्याला पहिल्यांदा झोपेच्या गोळ्या दिल्या, नंतर काठीने बेदम मारहाण केली आणि दोरीने गळा आवळून खून केला, असे त्याने सांगितले.

विश्नोई यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी पोलिसांना सांगितले की, ताहिर विद्यार्थ्यांचे सातत्याने लैंगिक शोषण करत असल्याने ते नाराज होते. हत्येच्या दोन दिवस अगोदर, ताहिर यूपीतील त्याच्या गावातून परतला होता.

विद्यार्थ्यांनी 26 एप्रिल रोजी मेडिकलच्या दुकानातून झोपेच्या गोळ्या विकत घेतल्या, पण ताहिर रात्रीचे जेवण बाहेरच करायचा. तो परत आल्यावर विद्यार्थ्यांनी त्याला गोळ्यांसह दही दिले. काही वेळाने मौलाना झोपी गेला. विद्यार्थ्यांनी स्टोअररूममध्ये जाऊन काठी आणि दोरी आणली. तो झोपला असताना त्यांनी काठीने त्याच्या डोक्यावर प्रहार केला. त्याने उभे राहण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी त्याच्या गळ्यात दोरी टाकून त्याचा गळा दाबला. त्यानंतर तो बेशुद्ध पडला व मृत झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वयाच्या पन्नाशीत गुन्हा, ३४ वर्षांनी ८४व्या वर्षी दोषी, आज शिक्षेची सुनावणी; आरोपीचा VIDEO VIRAL

माधुरी दीक्षित त्या कृतीमुळे झाली ट्रोल, उत्तर देताना म्हणाली...'कोणाचाही वाईट हेतू नव्हता पण...'

Latest Marathi News Live Update : काश्मीरमध्ये पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ

IND vs AFG, T20I: अफगाणिस्तान पहिल्यांदाच भारताचे आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी यजमानपद भूषवणार! कुठे होणार सामने?

Stock Market Today: इराणच्या निर्णयाचा शेअर बाजाराला फटका! सेन्सेक्स-निफ्टी घसरले, गुंतवणूकदारांनी काय करावे?

SCROLL FOR NEXT