Bikram Singh Majithia
Bikram Singh Majithia esakal
देश

Drugs Case : अकाली दलाच्या नेत्याचं कोर्टात आत्मसमर्पण

सकाळ डिजिटल टीम

मजिठिया यांच्यावर ड्रग्सप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ड्रग्जप्रकरणी (Drugs Case) अकाली दलाचे नेते बिक्रम सिंह मजिठिया (Bikram Singh Majithia) यांनी आत्मसमर्पण केलंय. बिक्रम सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाकडून 23 फेब्रुवारीपर्यंत दिलासा मिळाला होता. त्यानंतर त्यांनी आज मोहाली सत्र न्यायालयात (Mohali Sessions Court) आत्मसमर्पण केलं. दरम्यान, न्यायालयानं बिक्रम सिंह यांना 8 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावलीय. सर्वोच्च न्यायालयानं मजिठिया यांना 20 फेब्रुवारी रोजी पंजाब विधानसभेच्या निवडणुका (Punjab Assembly Election) झाल्यानंतर, ट्रायल कोर्टासमोर आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले होते.

सर्वोच्च न्यायालयानं 31 जानेवारी रोजी शिरोमणी अकाली दलाचे नेते बिक्रम सिंह यांना ड्रग्जप्रकरणी दिलासा देत पंजाब पोलिसांना 23 फेब्रुवारीपर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले होते, जेणेकरून ते राज्यातील निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील, असं नमूद केलं होतं. मुख्य न्यायमूर्ती एन. व्ही. रमण, न्यायमूर्ती ए. एस. बोपण्णा आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठानं हा निर्णय घेतलाय.

मजिठिया यांच्यावर गेल्या वर्षी 20 डिसेंबर रोजी ड्रग्सप्रकरणी (एनडीपीएस) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं (Haryana High Court) 24 जानेवारी रोजी मजिठिया यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) अपील दाखल करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयानं 27 जानेवारी रोजी पंजाब सरकारला 31 जानेवारीपर्यंत मजिठिया यांच्यावर कोणतीही जबरदस्ती कारवाई करू नये, असं सांगितलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT