देश

सर्व भारतीयांचा ‘डीएनए’ सारखाच- सरसंघचालक

नामदेव कुंभार

गाझियाबाद : ‘सर्व भारतीयांचा ‘डीएनए’ सारखाच आहे, त्यामुळे ‘भारतात इस्लामला धोका असल्याच्या’ भयचक्रात मुस्लिमांनी अडकू नये, असे आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज केले. मुस्लिम राष्ट्रीय मंचाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

‘हिंदुस्तानी प्रथम, हिंदुस्तान प्रथम’ ही आजच्या कार्यक्रमाची संकल्पना होती. सरसंघचालक भागवत म्हणाले,‘‘लोक कोणत्या मार्गाने प्रार्थना करतात, यावरून त्यांना एकमेकांपासून वेगळे करता येणार नाही. धर्माच्या नावाने जे लोक एखाद्या व्यक्तीची हत्या करतात, हे हिंदुत्वाच्या विरोधी कृत्य करतात. भारतात एकतेशिवाय प्रगती होणे शक्य नाही. ही एकता राष्ट्रवाद आणि पूर्वजांचे वैभव या आधारावर असावी. हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील वाद हा चर्चेतूनच सोडविता येईल. ‘भारतात इस्लाम धोक्यात आहे,’ या भयचक्रात कोणीही अडकू नये. आपण सर्व जण लोकशाही देशात राहतो. त्यामुळे हिंदूंचे किंवा मुस्लिमांचे वर्चस्व देशात असू शकत नाही. केवळ भारतीयांचेच येथे वर्चस्व असेल.’’

राजकारणात संघ नाही

आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मोहन भागवत यांनी संघाची भूमिका स्पष्ट केली. ‘मी येथे प्रतिमा बदल करण्यासाठी किंवा मतपेढीसाठी आलेलो नाही. संघ कधीही राजकारण करत नाही आणि प्रतिमा सांभाळण्याचीही संघाला चिंता नाही. संघ केवळ देशाला सशक्त करण्यासाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी काम करत असतो,’ असे त्यांनी सांगितले.

हिंदू-मुस्लिम एकता हा दिशाभूल करणारा शब्द आहे. हे दोघे मुळात वेगळे नाहीतच, एकच आहेत. धर्म कोणताही असो, सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे.

- मोहन भागवत, सरसंघचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Match Ban: मोठी बातमी! पाकिस्तानी खेळाडू भारतात येऊ शकतील, पण...; भारत-पाकिस्तान सामन्यांवर सरकारचा महत्त्वाचा निर्णय

अवघ्या 24 तासांत बदलणार कन्या राशीसकट आणखी दोन राशींचं नशीब ! बुधाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे मिळणार पैसाच पैसा

T20 Mumbai League: श्रेयस अय्यर, अंगकृश रघुवंशी एकाच संघात! आकाश पारकर १२ लाख रुपयांच्या सर्वोच्‍च बोलीसह करारबद्ध

Tamil Nadu political drama विजयसमोर पेच! सत्तास्थापनेचा दावा केला पण बहुमतच नाही; राज्यपालांनाही विश्वास नाही, जादुई आकडा कसा गाठणार TVK?

Stray Dog : देगलूरात पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याचा उच्छाद; पंधरा ते सोळा नागरिक जखमी, नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनाही चावा

SCROLL FOR NEXT