Zomato launches pure veg mode and fleet for vegetarian
Zomato launches pure veg mode and fleet for vegetarian Esakal
देश

Zomato News : झोमॅटोच्या 'प्युअर व्हेज' घोषणेनंतर संतापले लोक; डिलिव्हरी पर्सनच्या सुरक्षेसाठी कंपनीने मागे घेतला मोठा निर्णय

अंकिता खाणे (Ankita Khane)

Zomato drops green dress code amid pure veg fleet row : प्रसिद्ध ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने काल (मंगळवारी) आपल्या शाकाहारी ग्राहकांसाठी खास सेवा घोषित केली होती. ही खास सेवा अशा लोकांसाठी होती जे शुद्ध शाकाहारी आहेत. कंपनीचे संस्थापक आणि सीईओ दीपंदर गोयल यांनी ही प्युअर व्हेज मोड सेवा सुरू करण्याची घोषणा केली.

या नवीन सेवेबद्दल माहिती देताना गोयल म्हणाले की, कंपनी भारतातील शुद्ध शाकाहारी ग्राहकांसाठी प्युअर व्हेज फ्लीट सुरू करत आहे. यासोबतच कंपनीच्या सीईओने त्या लोकांचाही हवाला दिला ज्यांना भारतात नवीन सेवा उपलब्ध करून द्यायची आहे.

'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना दीपंदर गोयल यांनी लिहिले की, भारतात शाकाहारी लोकांची संख्या जगात सर्वाधिक आहे. लोकांच्या फीडबॅकच्या आधारेच आम्ही ही नवीन सेवा सुरू केली आहे. झोमॅटोच्या शाकाहारी ग्राहकांसाठी लाल रंगाच्या बॉक्सऐवजी हिरव्या रंगाचे बॉक्स वापरण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यासोबतच डिलिव्हरी बॉय फक्त हिरवा शर्ट घालणार आहे. हे जेवण फक्त शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंटमधून मिळेल. मात्र, या सेवेला वाईट प्रतिसाद मिळाल्यास आम्ही ती बदलू, असेही त्यांनी लिहिले आहे.

मंगळवारी गोयल यांच्या घोषणेनंतर लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया समोर आल्या. झोमॅटोच्या या निर्णयाला मोठ्या संख्येने लोकांनी विरोध केला. आज आपण व्हेज खातोय की नॉनव्हेज, हे समाजाला सांगू नये, असंही अनेकांनी म्हटलं आहे. या निर्णयावर अनेकांनी संताप व्यक्त केला. अशा स्थितीत बुधवारी उशीर न करता गोयल यांनी आपला निर्णय मागे घेतला आहे.

गोयल यांचं नवं ट्विट

आमच्या प्युअर व्हेज फ्लीटवर अपडेट - आम्ही शाकाहारी लोकांसाठी फ्लीट सुरू ठेवू, पण डिलिव्हरी पार्टनरसाठी हिरवा डबा आणि हिरवा टी-शर्ट वापरण्याचा निर्णय आम्ही मागे घेत आहोत. आमचे सर्व रायडर्स लाल रंगाचे कपडे परिधान करतील. याचा अर्थ असा की शाकाहारी ऑर्डरसाठीचा फ्लीट ओळखला जाणार नाही (परंतु ॲपवर असे दिसून येईल की तुमची ऑर्डर फक्त शाकाहारी फ्लीट घेऊन येत आहे). आम्हाला हे समजले आहे की आमचे काही मांसाहारी ग्राहक यामुळे अडचणीत येऊ शकतात. आणि आमच्यामुळे असे घडले तर ती चांगली गोष्ट नाही. त्याचबरोबर आमच्या रायडर्सची शारीरिक सुरक्षा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

काल रात्री याबद्दल बोलल्याबद्दल सर्वांचे आभार. तुम्ही आम्हाला या रोलआउटचा परिणाम समजावून सांगितला. हे खूप प्रभावी होते. आम्ही तुमच्या नेहमी उद्धटपणा किंवा गर्व न दाखवता तुमचं ऐकू. आम्ही तुमच्या सेवेत तत्पर आहोत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT