Bipin Rawat 
देश

राजकारणापासून आम्ही नेहमी दूर असतो : बिपीन रावत

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राजकारणापासून आम्ही नेहमी दूर असतो. आम्ही सरकारने दिलेल्या आदेशानुसार काम करतो, असे सरसेनाध्यक्ष बिपीन रावत यांनी म्हटले आहे.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सरसेनाध्यक्ष या नवीन पदाची घोषणा केल्यानंतर या पदाचा पदभार निवृत्त जनरल बिपीन रावत यांनी स्वीकारला होता. देशाचे पहिले सरसेनाध्यक्ष (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ - सीडीएस) यांची नियुक्ती झाली असून, तिन्ही दलांमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. बिपीन रावत यांनी नुकतेच नागरिकत्व कायद्यावर वक्तव्य करताना जे लोक नागरिकांना चुकीच्या मार्गाने घेऊन जातात, ते नेते नसतात असे वक्तव्य केल्याने त्यांच्यावर काँग्रेसकडून आरोप करण्यात आले होते. आज गार्ड ऑफ ऑनर त्यांना देण्यात आला.

पहिल्या पत्रकार परिषदेत बोलताना बिपीन रावत म्हणाले, की तिन्ही दलांमध्ये एकवाक्यता ठेवण्याची जबाबदारी आहे. तिन्ही दले एक टीम म्हणून काम करतात. लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. लष्कराच्या योजना जगाला सांगितल्या जात नाहीत. लष्कर कायमच राजकारणापासून दूर राहिले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT