nambi narayanan  Sakal
देश

Nambi Narayan: ISROचे वैज्ञानिक नंबी नारायण यांच्यावरील आरोप खोटे; सीबीआयची हायकोर्टात माहिती

नंबी नारायण यांच्या जीवनावर आधारित रॉकेट्री नावाचा सिनेमा नुकताच आला होता, यामध्ये अभिनेता आर. माधवन यानं प्रमुख भूमिका साकारली आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : ISROचे माजी वैज्ञानिक नंबी नारायण यांना झालेली अटक बेकायदा असून त्यांच्यावरील आरोप खोटे आहेत अशी माहिती केंद्रीय तपास एजन्सीनं केरळ हायकोर्टाला दिली आहे. 90च्या दशकात नंबी नारायण यांच्याविरोधात चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध सीबीआयने नोंदवलेल्या खटल्याची केरळ उच्च न्यायालयात सध्या सुनावणी सुरू आहे. (allegations against ISRO scientist Nambi Narayan are false CBI informs to Kerala High Court)

सीबीआयनं हायकोर्टाला सांगितलं की, सन १९९४ मधील इस्त्रोविरोधातील हेरगिरी प्रकरणात वैज्ञानिक नंबी नारायण यांच्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे असून त्यांना झालेली अटकही बेकायदा होती. अशा प्रकारे खोट्या केसेस दाखल करणं ही राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं गंभीर बाब होती. इस्त्रोच्या वैज्ञानिकाविरोधातील या कट-कारस्थानात परदेशी शक्तींचा सहभाग देखील होता.

नंबी नारायण यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं की, भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या क्रायोजेनिक इंजिनला थांबवण्यासाठी हा कट रचण्यात आला होता. त्यानंतर सीबीआयनं देखील नारायण यांच्यावरील आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. आरोपी अधिकाऱ्यांच्या जामीन अर्जावर न्यायालय विचार करत असताना सीबीआयनं हे विधान केलं आहे.

हे ही वाचा : पुण्याचा पहिला 'माॅल'- तुळशीबाग

नंबी नारायण यांच्या जीवनावर आधारित रॉकेट्री नावाचा सिनेमा नुकताच आला होता, यामध्ये अभिनेता आर. माधवन यानं प्रमुख भूमिका साकारली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA T20I: हार्दिक पांड्याचे पुनरागमन निश्चित, शुभमन गिलबाबत अनिश्चितता; कधी जाहीर होणार भारताचा ट्वेंटी-२० संघ?

Cosmetic Gynecology: कामा रुग्णालयात लवकरच ‘कॉस्मेटिक गायनेकोलॉजी’; देशात सरकारी रुग्णालयात प्रथमच विभाग सुरु होणार

Gold-Silver Price: असं कसं झालं? सोन्या-चांदीचे भाव एवढे का घसरले? जाणून घ्या नवे दर

Latest Marathi News Live Update : मतदानाची वेळ संपूनही मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा

Khelo India University Games: १०० मीटर शर्यतीत महाराष्ट्राची हुकुमत, गायत्री, रिंकीला रौप्‍य

SCROLL FOR NEXT