alms seeker donated 90000 for covid19 at tamilnadu photo viral 
देश

भिक्षेतून मिळवलेली रक्कम कोरोना रुग्णांसाठी दान...

वृत्तसंस्था

चेन्नई (तमिळनाडू): एका भिक्षेकराने भिक्षा मागून जमविलेली रक्कम कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सरकारकडे दान केली. भिक्षेकऱयाचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स त्यांच्या समाजकार्याचे कौतुक होत आहे.

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. विविध देशांनी लॉकडाऊन केल्यामुळे अनेकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पण, समाजाकडून मिळविलेली रक्कम समाजाच्या कल्याणासाठी दान करण्याचा निर्णय एका भिक्षेकऱयाने घेतला. भिक्षा मागून मिळविलेली 90 हजार रुपयांची रक्कम त्यांनी सरकारकडे जमा केली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या बाबांना 'समाजसेवक' असे म्हटले आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, तामिळनाडूच्या पुलपंडीयन भागात असलेल्या एका मंदिराच्या बाहेर बसून आजोबा भिक्षा मागून उदरनिर्वाह करतात. आजोबांनी मे महिन्यात १० हजार रुपयांची रक्कम सरकारकडे केले. शिक्षण क्षेत्रासाठी मला ही रक्कम दान करायची होती. पण, सध्या कोरोनाचा मुद्दा महत्त्वाचा असल्यामुळे ही रक्कम कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरावी, असे बाबांनी म्हटले होते. त्यांनी पुन्हा 90 हजार रुपये सरकारकडे जमा केले आहेत. दरम्यान, बाबांचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्यानंतर कौतुक होऊ लागले आहे. अनेकांनी खरा देशभक्त असल्याचे म्हटले आहे. तर कोरोना रुग्णांसाठी या वृद्ध व्यक्तीने केलेलं कार्य हे प्रेरणादायी असल्याचे नेटिझन्सनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT