Alt News mohammad zubair  esakal
देश

वादग्रस्त ट्विट प्रकरणी मोहम्मद जुबेरला मोठा दिलासा; कोर्टाकडून जामीन मंजूर

वादग्रस्त ट्विट प्रकरणात ऑल्ट न्यूजचे संस्थापक मोहम्मद जुबेर यांना कोर्टाकडून दिलासा मिळालाय.

सकाळ डिजिटल टीम

वादग्रस्त ट्विट प्रकरणात ऑल्ट न्यूजचे संस्थापक मोहम्मद जुबेर यांना कोर्टाकडून दिलासा मिळालाय.

नवी दिल्ली : वादग्रस्त ट्विट प्रकरणी (Controversial Tweet Case) ऑल्ट न्यूजचे (Alt News) संस्थापक मोहम्मद जुबेर (Mohammed Zubair) यांना पटियाला हाऊस कोर्टाकडून (Patiala House Court) मोठा दिलासा मिळालाय. मोहम्मद जुबेरला पटियाला हाऊस कोर्टाच्या सत्र न्यायालयातून जामीन मिळाला असून जुबेरला 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन दिलाय.

दिल्ली पोलिसांनी जुबेरच्या जामिनाला विरोध केला होता. जुबेरला जामीन मंजूर करताना न्यायालयानं सांगितलं की, 'तो परवानगीशिवाय देश सोडू शकत नाही'. दिल्लीच्या (Delhi) पटियाला हाऊस कोर्टात मोहम्मद जुबेरच्या जामीन अर्जावर गुरुवारी चर्चा पूर्ण झाली. न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवला होता. या याचिकेवर आज न्यायालयानं निकाल दिलाय. कोर्टात मोहम्मद जुबेरच्या वतीनं त्यांचे वकील वृंदा ग्रोव्हर आणि दिल्ली पोलिसांच्या वतीनं विशेष सरकारी वकील अतुल श्रीवास्तव उपस्थित होते.

खटल्याच्या सुनावणीदरम्यान कोर्टानं पोलिसांना ट्विटची तारीख विचारली होती, त्यावर एसपीपी अतुल श्रीवास्तव यांनी कोर्टाला ट्विटच्या तारखेची माहिती दिली. एसपीपी यांनी सांगितलं की, ट्विट 2014 पूर्वीचं आणि 2014 नंतरचं आहे. हे जाणूनबुजून करण्यात आल्याचं स्पष्ट झालंय. त्याचा हेतू काय, अशी विचारणा न्यायालयानं केली. एसपीपी म्हणाले होते, की 2014 मध्ये सरकार बदललं होतं असं त्यांना सांगायचं आहे. हे ट्विट दुसऱ्या बाजूच्या लोकांना भडकवण्यासाठी आणि चुकीची माहिती निर्माण करण्यासाठी करण्यात आलं होतं. हनुमानजी ब्रह्मचारी आहेत आणि तुम्ही ट्विटमध्ये हनीमूनची तुलना केलीय, असं त्यांनी नमूद केलं होतं. त्याचवेळी त्यांनी सांगितलं होतं की, जुबेरला 2022 मध्ये परदेशी निधीही मिळाला होता, असंही ते म्हणाले.

मोहम्मद जुबेरवर काय आरोप?

फॅक्ट चेकर वेबसाइट AltNews चे सह-संस्थापक मोहम्मद जुबेर यांच्यावर यती नरसिंहानंद सरस्वती, बजरंग मुनी आणि आनंद स्वरूप यांना 'द्वेष पसरवणारे' म्हणून संबोधल्याचा आरोप आहे. ज्येष्ठ वकील कॉलिन गोन्साल्विस यांनी न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी यांच्या खंडपीठासमोर तातडीने सुनावणीसाठी या प्रकरणाचा उल्लेख केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आता रेस्टॉरंटमध्ये बाटलीबंद पाणी खरेदीची सक्ती नाही; FDA कडून आदेश लागू, नवीन नियम नेमके काय आहेत?

IND vs IRE 1st T20I Live: वैभव सूर्यवंशीला का नाही खेळवले? श्रेयस अय्यर बघा काय म्हणाला; आमच्याकडे अनुभवी खेळाडू आहेत अन्...

रोज केस धुवू शकत नाही म्हणून... केसांसाठी 'हा' शॅम्पू वापरते प्राजक्ता गायकवाड; स्वतः सांगितलं नाव आणि उपयोग

Mahanagar Gas Limited: 90 दिवसांत PNG घ्या, नाहीतर LPG बंद! मुंबईकरांसाठी महत्त्वाची सूचना

IND vs IRE 1st T20I Live: वैभव सूर्यवंशीचे पदार्पण झाले का? श्रेयस अय्यरच्या निर्णयाने सारे चकीत... पाहा भारताची प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT