amar singh 
देश

निधनापूर्वी अमर सिंग यांनी RSSशी संबंधित संस्थेला दिली कोट्यवधींची देणगी

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - समजावादी पक्षाचे नेते अमर सिंग यांचे प्रदीर्घ आजारामुळे सिंगापूरमध्ये निधन झालं. त्यांच्यावर सिंगापूरमध्ये उपचार सुरू होते. गेल्या काही महिन्यांपासून अमर सिंग आजारी होते. त्यांच्या मृत्यूच्या अफवाही त्याकाळात पसरल्या होत्या. तेव्हा अमर सिंग यांनी व्हिडिओ शेअर करून टायगर जिंदा है असं म्हटलं होतं. तेव्हा आपण जिवंत असून आजाराशी लढा देत असल्याचे ते म्हणाले होते. तसंच काही लोक मृत्यूची खोटी बातमी पसरवत आहेत. अमर सिंग यांची याआधीही अनेकदा तब्येत बिघडली होती. 

राज्यसभा खासदार अमर सिंग यांनी काही वर्षांपूर्वी त्यांची संपत्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या सेवा भारती संस्थानला दान केली होती. अमर सिंग यांनी त्यांना वारसा म्हणून मिळालेली मालमत्ता वडिलांच्या नावाने सेवा भारती संस्थेला दिली होती. आजमगढ इथं असलेलं घर वडिलांच्या मृत्यूनंतर रिकामंच होतं. याचा त्यामध्ये समावेश आहे. दान केलेल्या मालमत्तेची किंमत जवळपास 15 कोटी रुपये इतकी असल्याचंही सांगितलं जातं. 

अमर सिंग यांनी 2018 मध्ये म्हटलं होतं की,'संघ एक मोठी संस्था आहे. त्यासाठी दान देणं ही लहान गोष्ट असेल. माझ्या वडिलांच्या नावे संपत्ती दान करून मी समाजाची सेवा करण्यासाठी हातभार लावण्याचा हा एक प्रयत्न आहे.' त्यांनी संपत्ती दान केल्यानंतर काहींनी अमर सिंग भाजपमध्ये जाण्यास इच्छुक असल्याचंही म्हटलं होतं. राजकीय कारकिर्दीत अमर सिंग हे नेहमीच आरएसएसचा विरोध करत राहिले आहेत. मात्र गेल्या काही वर्षात आरएसएसबाबत त्यांचे मत थोडे बदलले होते.

आजमगढमध्ये बालपण गेलेले अमर सिंग हे समाजवादी पक्षाचे नेते होते. मात्र 2010 मध्ये समाजवादी पक्षातून त्यांची हकालपट्टी झाली होती. त्यानंतर पूर्वांचल राज्याचा दर्जा मिळावा यासाठी राष्ट्रीय लोक मंच नावाने पक्षही काढला होता. त्यांनी पदयात्राही काढली होती. पण त्यांच्या पक्षाला यश मिळालं नव्हतं. 

समाजवादी पक्षातून बाहेर पडल्यानंतर राजकारणातही ते फारसे सक्रीय नव्हते. 5 जुलै 2016 मध्ये त्यांची राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाली होती. दरम्यान, आजारी पडण्याआधीच त्यांची भाजपशी जवळीक वाढली होती. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवातही राज्यसभेपासूनच झाली होती. 1996 मध्ये ते पहिल्यांदा राज्यसभा खासदार झाले होते. त्यानंतर 2002 आणि 2008 मध्येही ते राज्यसभेचे खासदार झाले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

Viral Video: मृत्यूच्या दारातून परत आला... रामकुंडात अडकला तरूण, गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ! थरारक व्हिडिओ व्हायरल

Negative Energy Remedies: आजपासून चातुर्मास सुरू, रात्री करा 'हे' चमत्कारिक उपाय, नकारात्मकता राहील दूर

Nashik Crime Branch : चहासाठी थांबले अन् पोलिसांनी पकडले; स्कॉर्पिओतून तलवारी व चॉपर जप्त

SCROLL FOR NEXT