Amarinder Singh And Congress Party Leadership esakal
देश

काँग्रेस पक्षाचे नेतृत्व कधीच शिकणार नाही, अमरिंदर सिंग यांचे टीकास्त्र

'उत्तर प्रदेशातील दारुण पराभवाला जबाबदार कोण?'

गणेश पिटेकर

चंदीगड : पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा मोठा पराभव झाला आहे. यात पंजाबमध्ये पक्षाचा झालेल्या पराभवास कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या काळातील प्रस्थापित विरोधी लाट जबाबदार असल्याचे काँग्रेसने सांगितले आहे. याचा समाचार माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांनी घेतला आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, काँग्रेस पक्षाचे (Congress Party) नेतृत्व कधीच शिकणार नाही ! उत्तर प्रदेशातील दारुण पराभवाला जबाबदार कोण? आणि मणिपूर, गोवा, उत्तराखंड विधानसभा निवडणुकांमधील पीछेहाटी मागे कोण जबाबदार ? याचे उत्तर 'काँग्रेस पक्षाचे नेतृत्व कधीच शिकणार नाही !' हे ठळक अक्षरात भिंतीवर लिहून ठेवा. (Amarinder Singh Attack On Congress Party Over Defeating In Assembly Elections)

मात्र मला नेहमी वाटते की ते हे वाचायचे टाळतील, असा टोला सिंग यांनी काँग्रेस नेतृत्वाला लगावला आहे. पंजाबमध्ये (Punjab Assembly Elections 2022) काँग्रेसने पुढे आणलेले चरणजितसिंग चन्नीचे नेतृत्वाला कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या प्रस्थापित विरोधी लाटेचा फटका बसला आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाला नागरिकांनी मतदान केले आहे, या शब्दांमध्ये काँग्रेस पक्षाचे नेते रणदीपसिंह सुर्जेवाला यांनी पंजाबमधील पराभवाची मीमांसा केलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Ambani Assets Seized : ईडीची अनिल अंबानींविरोधात सर्वात मोठी कारवाई; मुंबई, पुण्यासह देशभरातील हजारो कोटींची संपत्ती जप्त

Arjun Sonawane : धनुर्विद्येतील 'अर्जुन' हरपला! राष्ट्रीय पदकविजेता खेळाडू अर्जुन सोनवणेचे अपघाती निधन

Mumbai News: ...तर केवळ पहिलीपासून हिंदीला विरोध! नागरिकांच्या प्रतिसादानंतर समिती अध्यक्षांची माहिती

Stock Market Opening Bell : नोव्हेंबरची सुरुवात घसरणीने! पण बाजारात पुन्हा तेजीचा सूर? जाणून घ्या शेअर बाजारातील घडामोडी

Gold Rate Today: खुशखबर ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने झाले स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT