Rahul and Priyanka Gandhi Team eSakal
देश

नये है वह! राहुल - प्रियांका गांधींसंदर्भात काँग्रेस नेत्याचे मोठं वक्तव्य

काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजीचं राजकारण सुरु असल्याचं पाहायला मिळतं आहे.

सुधीर काकडे

पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपुर्वीच मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळालं. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिदर सिंग यांच्या राजीनाम्यापासून ते चरणजित चन्नी यांच्या मुख्यमंत्री पदासाठीच्या नियुक्तीपर्यंत काँग्रेसमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला. राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती. त्यातच आता पुन्हा एकदा काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेसनेते नवज्योत सिंग सिद्धू यांचे कट्टर विरोधक असलेल्या अमरिंदर सिंग यांनी सिद्धू विरोधात दंड थोपटले आहेत.

नवज्योत सिंग सिद्धू यांना मुख्यमंत्री जर मुख्यमंत्री करण्याचा विचार केला, तर त्याला आपण स्पष्ट विरोध करु असे अमरिंदर सिंग यांनी सांगितले आहे. तसेच जर पक्षाने नवज्योत सिंग सिद्धू यांना संधी दिली तर आपण पुर्ण ताकदीने विरोध करणार आहे. कारण सिद्धू यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. हा व्यक्ती अत्यंत धोकादायक आहे. देशाला अशा लोकांपासून वाचवणे आवश्यक आहे. सिद्धूला रोखण्यासाठी आपण शक्य तो प्रयत्न करु असेही त्यांनी स्पष्ट केले.

अमरिंदर सिंग यांनी यावेळी असेही सांगितले की, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे आपण तीन महिन्यांपुर्वीच राजीनाम्याचा प्रस्ताव दिला होता. सोनिया गांधींनी आपल्याला तेव्हा आपल्याला तुर्तास राजीनामा देऊ नये असे सांगितले आहे. पुढे बोलताना ते असेही म्हणाले की, राहूल गांधी आणि प्रियंका गांधी यांना जास्त अनुभव नाही, त्यांच्या सल्लागारांनी त्यांना चुकीची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arun Dongale Gokul Milk Election : गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळेंची मोठी घोषणा; ‘ही माझी शेवटची गोकुळची निवडणूक’

Marathi News Live Updates : मनोज जरांगेच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Mumbai Metro: गणेशोत्सवात मुंबई मेट्रोची स्पेशल सर्व्हिस! मध्यरात्रीपर्यंत विशेष सेवा, शेवटची ट्रेन कधी धावणार?

Manoj Jarange: नोटिसा अन् चौकशा सुरू... आता मनोज जरांगे काय करणार? मुंबईबाबत घेतला मोठा निर्णय, बावनकुळेंना नेमकं काय म्हणाले?

गणरायाच्या आगमनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला! कोकणात जाताना कारचा अपघात; एकाचा मृत्यू, 4 जण जखमी

SCROLL FOR NEXT