Amarnath Yatra Accident esakal
देश

अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरुंवर काळाचा घाला; अपघातात चार जण जखमी

सकाळ डिजिटल टीम

पोलीस आणि स्वयंसेवकांनी यात्रेकरूंना अपघातस्थळावरून रुग्णालयात नेलंय.

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील (Jammu-Srinagar National Highway) रामबन जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी झालेल्या अपघातात चार अमरनाथ यात्रेकरू (Amarnath Yatra) जखमी झालेत. जिल्ह्यातील बनिहालच्या शेरबीबी भागात प्रवासी टेम्पो उलटल्यानं चार अमरनाथ यात्रेकरू जखमी झाले. जखमींना बनिहाल रुग्णालयात (Banihal Hospital) हलवण्यात आलं असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान, पोलीस (Police) आणि स्वयंसेवकांनी त्यांना अपघातस्थळावरून रुग्णालयात नेलं. प्रभारी बीएमओ बनिहाल डॉ. शब्बीर दार यांनी सांगितलं की, चार जखमींना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं असून सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत. कुंदन कुमार (56) रा. उत्तर प्रदेश, विनायक गुप्ता (10), अनिता गुप्ता (49), संजय गुप्ता यांची पत्नी अशी जखमींची नावं आहेत. सध्या पोलिसांनी क्रेनच्या सहाय्यानं अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरून हटवलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त वाहनाचा चालक 9 अमरनाथ यात्रेकरूंना घेऊन जात होता. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरूय.

अमरनाथ यात्रेचा आज दुसरा दिवस

श्री अमरनाथ यात्रेचा आज दुसरा दिवस आहे. गुरुवारी सकाळी पहलगाममधील नुनवान बेस कॅम्पमधून 2,750 यात्रेकरूंची पहिली तुकडी आणि बालटाल बेस कॅम्पमधून 6,215 यात्रेकरू पवित्र गुहेत विराजमान असलेल्या बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी रवाना झाले आहेत. बालटाल आणि पहलगाम मार्गावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आलीय. याशिवाय, अमरनाथ यात्रेसाठी सुरक्षेसह आरोग्याची पुरेशी व्यवस्था करण्यात आलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : e-KYC करताना OTP येत नसल्याची तक्रार, मंत्री आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती...

Latest Marathi News Live Update : 'दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवा अन्यथा...'; लष्करप्रमुख जनरल द्विवेदींचा पाकिस्तानला इशारा

आजचे राशिभविष्य - 04 ऑक्टोबर 2025

Easy Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा काहीतरी हटके! लिहून घ्या क्रिस्पी स्मॅश्ड पोटॅटो सॅलडची सोपी रेसिपी

अग्रलेख : दहा तोंडी राजकारण..!

SCROLL FOR NEXT