amartya sen  esakal
देश

नोबेल विजेते अमर्त्य सेन बंगालचा सर्वोच्च नागरिक स्वीकारणार नाहीत, मुलीने सांगितले कारण

धनश्री ओतारी

नोबेल पुरस्कार विजेते प्रख्यात अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी पश्चिम बंगाल सरकारच्या वतीनं दिला जाणार 'वंग विभूषण' पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. दरम्यान, अमर्त्य सेन यांची मुलगी अंतरा देव सेन यांनी पुरस्कार नाकारण्याचं कारण स्पष्ट केलं आहे. (amartya sen will not receive bengal govt award bang vibhushan)

पश्चिम बंगाल सरकारच्या वतीनं विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी वंग विभूषण पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारांचं वितरण लवकरच केलं जाणार आहे. अमर्त्य सेन यांच्या नावाचाही पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. मात्र, अमर्त्य सेन सध्या युरोपात आहेत. पुरस्कार स्वीकारण्यासाठी येत नसल्याचे त्यांनी जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सरकारलं कळवलं होतं. आता त्यांनी पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे.

...म्हणून पुरस्कार घेण्यास नकार

‘बाबांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळं अन्य कुणाला तरी हा पुरस्कार दिला जावा अशी त्यांची इच्छा आहे,’ असं अंतरा देव यांनी म्हटले आहे.

पुरस्कार विजेत्यांमध्ये ईस्ट बंगाल, मोहन बगान आणि मोहम्मदन या प्रसिद्ध फुटबॉल क्लबच्या प्रमुखांचा समावेश आहे. त्याशिवाय अभिजित विनायक बंडोपाध्याय यांना देखील सन्मानित केले जाणार आहे.

एसएसकेएम रुग्णालयाला देखील पुरस्कार जाहीर झाला आहे. अमला शंकर, महाश्वेता देवी, संध्या मुखर्जी, सुप्रिया देवी आणि मन्ना डे अशा व्यक्तींना वंग विभूषणनं गौरवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT