Ambani Bought The Most Expensive Villa 
देश

Ambani : अंबानींचा दुबईतला सर्वात महागडा व्हिला! SRK अन् बेकहॅम होणार शेजारी, पाहा किंमत

सर्व प्रकरच्या सुविधांनीयुक्त असलेले हे घर 7 स्टार हॉटेलपेक्षा कमी नाही.

सकाळ डिजिटल टीम

सर्व प्रकरच्या सुविधांनीयुक्त असलेले हे घर 7 स्टार हॉटेलपेक्षा कमी नाही.

Ambani Bought The Most Expensive Villa in Dubai : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत याने एक आलिशान घर (सर्वात महाग) विकत घेतले आहे. दुबईत त्याने हे घर घेतले असून हे दुबईतील आतापर्यंतचे सर्वात महागडे घर ठरले आहे. समुद्रकिनाऱ्यावर बांधलेल्या या आलिशान घराची (हवेलीची) किंमत सुमारे 80 दशलक्ष डॉलर इतकी असल्याची माहिती मिळत आहे. अतिशय आलिशान आणि लक्झरी व्हिला समुद्रकिनाऱ्याच्या उत्तरेकडील भागात आहे. सर्व प्रकरच्या सुविधांनीयुक्त असलेले हे घर 7 स्टार हॉटेलपेक्षा कमी नाही, अशी चर्चा आहे. काय आहे या घराची खासियत पाहुया..

करार गुप्त ठेवला

अंबानींचा लहान मुलगा अनंतसाठी पाम जुमेराची मालमत्ता या वर्षाच्या सुरुवातीला खरेदी करण्यात आली होती. हा व्यवहार खाजगी असल्याने दुबईत झालेला हा व्यवहार गुप्त ठेवण्यात आल्याचे म्हणणे आहे. या मालमत्तेशी संबंधित लोकांचे म्हणणे आहे की, सध्या अंबानी या व्हिलाला दुरुस्त करण्यासाठी आणि त्याची सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी लाखो डॉलर्स खर्च करणार आहे.

लक्झरी सुविधांनी सुसज्ज असणारे घर

हा आलिशान व्हिला समुद्रकिनारी बांधला असून तो दुरूनच आकर्षित करतोय. सर्व प्रकारच्या सुविधा आणि एकूण 10 बेडरूम्स आहेत. पाहुण्यांसाठी येथे वेगळी व्यवस्था केली आहे. याशिवाय येथे इनडोअर आणि आउटडोअर स्विमिंग पूल उपलब्ध केले आहेत. खेळण्यासाठी वेगळी जागा असून जिम आणि एक खाजगी थिएटरही आहे.

अभिनेता शाहरुख खान असणार शेजारी

दुबई हे शहर जगभरातील श्रीमंत लोकांसाठी त्यांच्या जीवनशैलीसाठी पसंतीची बाजारपेठ म्हणून उदयास आले आहे. दुबई सरकारही सतत त्याचा प्रचार करत असते. दुबई सरकारने दीर्घकाळासाठी गोल्डन व्हिसा देऊन जगभरातील श्रीमंत लोकांना येथे राहण्यासाठी प्रेरित केले आहे. अंबानींपूर्वी बॉलिवूड मेगा स्टार शाहरुख खान आणि ब्रिटिश फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम यांनीही पत्नी व्हिक्टोरियासोबत मालमत्ता खरेदी केली आहे. इथे आता अंबानींचे नवे शेजारी शाहरुख खान आणि डेव्हिड बेकहॅम असणार आहेत.

अब्जावधी संपत्तीचा मालक आहे अनंत

मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत हा कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, अनंत अंबानींच्या 93.3 अब्ज डॉलर संपत्तीच्या तीन वारसांपैकी तो एक आहेत. अंबानी हे जगातील 11 व्या सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. अंबानी आता हळुहळु आपल्या व्यवसायाची धुरा आपल्या मुलांकडे सोपवत आहेत.

अंबानी परदेशातही मालमत्ता खरेदी करतात

अंबानी कुटुंब गेल्या काही काळापासून परदेशात मालमत्ता खरेदी करण्यात गुंतले आहे. अंबानींची तीन मुले इतर घरांसाठी परदेशात मालमत्ता शोधत आहेत. रिलायन्‍सने गेल्‍या वर्षी 79 दशलक्ष डॉलर्स खर्च करण्‍यासाठी UK मधील Stoke Park Limited विकत घेतले असून ज्यात जॉर्जियन काळातील हवेली आहे. अंबानींची मुलगी ईशा न्यूयॉर्कमध्ये एका घराच्या शोधात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT