Brijbhushan Singh Esakal
देश

POCSO Act : "पॉक्सो कायद्यात बदल करा"; अयोध्येतील महंत-साधू ब्रिजभूषण यांच्यासाठी एकवटले

Sandip Kapde

ऑलिम्पिक विजेत्या महिला खेळाडूंच्या आंदोलनामुळं संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. कुस्तीमहासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर त्यांच्यावर पॉक्सोसह विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान अयोध्येच्या महंतांनी वैदेही भवन येथे पॉक्सो कायद्यात दुरुस्तीची मागणी केली आहे.

धमाचार्य ५ जून रोजी रामकथा पार्क येथे होणाऱ्या जनजागृती रॅलीच्या मंचावरून POCSO कायद्यात दुरुस्तीची मागणी करणार आहेत. कुस्तीपटूंच्या आरोपांनी घेरलेले खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यासह देशभरातील धार्मिक नेते आणि न्यायतज्ज्ञ या कार्यक्रमात मोठ्या संख्येने जमणार आहेत.

महंत कमलनयन दास म्हणाले की, काही कायद्यांचा गैरवापर होत आहे. ५ जून रोजी संत समाज एकत्र येऊन काही कायद्यांमध्ये दुरुस्तीची मागणी करणार आहे. खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना पाठिंबा देताना ते म्हणाले की, त्यांच्यावरील आरोप चुकीचे आहेत.

लक्ष्मण किल्ल्याचे महंत मैथिली रमण शरण यांनी सांगितले की, ५ जून रोजी हजारो संत-महंत आणि अनेक माजी न्यायाधीश आणि अधिवक्त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. POCSO कायद्यात सुधारणा करण्यासाठी स्वाक्षरी केलेला प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठवला जाईल. आमचा सर्वांचा पॉक्सो कायद्याला विरोध नाही, परंतु त्याच्या गैरवापराची काळजी आहे.पॉक्सो कायद्याने समाजात कर्करोगाचे रूप धारण केले आहे.

आखाडा परिषदेचे प्रवक्ते महंत गौरीशंकर दास म्हणाले की, ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लावण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत. POCSO कायद्यात सुधारणा समाजाच्या हिताची असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डीले यांचं निधन, वयाच्या ६६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Manoj Jarange: बीडमध्ये होणारा ओबीसी मेळावा राष्ट्रवादी पुरस्कृत; मनोज जरांगे यांची टीका, राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न

Pro Kabaddi 2025: पराभवाची व्याजासह परतफेड! यू मुंबाचा तेलुगू टायटन्सवर दणदणीत विजय

Panchang 17 October 2025: आजच्या दिवशी ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

Pune Weather Update: अति हलक्या पावसाची पुणे परिसरात शक्यता

SCROLL FOR NEXT