Oxygen Cylinder File Photo
देश

कोरोना उद्रेक; रुग्णांसाठी सरकारनं थांबवला उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा

कोरोनाच्या रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा कमी पडू नये यासाठी सरकारचा महत्वाचा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या उद्रेकामुळे अचानक ऑक्सिजनच्या मागणी प्रचंड वाढ झाल्याने त्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा कमी पडू नये या हेतूनं केंद्र सरकारनं उद्योगांना लागणारा ऑक्सिजनचा पुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे.

देशात कोरोनाच्या उद्रेकांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर असून त्यानंतर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली या राज्यांमध्ये ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यापार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयानं या राज्यांना इतर राज्यांमधून ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक १५०० मेट्रिक टन लिक्विफाईड ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे. यासाठी विशेष ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवली जाणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्रालयाकडे राज्यासाठी तातडीने ऑक्सिजनच्या पुरवठ्याची मागणी केली होती. यानंतर रेल्वे मंत्रालयानं रेल्वेद्वारे द्रवरुप मेडिकल ऑक्सिजन (LMO) पुरवण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

कोकण आपलोच आसा! सनई चौघडे मालिकेची टीम पोहचली कणकवलीत, फोटो पाहिलेत का?

MPSC Paper Leak: परीक्षा झाली, मुलाखतीही झाल्या; मग MPSC ने संपूर्ण भरतीच का रद्द केली? पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

Latest Marathi News Live Update : टीम कुक ‘ॲपल’ची धुरा सोडणार

Kolhapur Gender Determination Case: गर्भलिंग निदानप्रकरणी ‘एस.पी. टोळी’ला मोका; राज्यातील पहिलीच कारवाई; ११ जणांवर बडगा

SCROLL FOR NEXT