amit shah announced center disaster relief plan for seven cities including mumbai pune  esakal
देश

Amit Shah : पुणे, मुंबईसह सात शहरांसाठी आपत्ती निवारणासाठी ८ हजार कोटी; गृहमंत्री शहा यांची घोषणा

गृहमंत्री शहा यांची घोषणा; पुणे, मुंबई पूर नियंत्रणासाठीही साहाय्य

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून मंगळवारी आठ हजार कोटींच्या तीन महत्त्वाच्या योजनांची घोषणा केली. यामध्ये सर्व राज्यांतील अग्निशामक दलांचे आधुनिकीकरण, पुणे व मुंबईसह सात प्रमुख शहरांतील पूर नियंत्रण आणि १७ राज्यांमध्ये भूस्खलनावर उपाययोजना करणे या या योजनांचा समावेश आहे.

देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या आपत्ती नियंत्रण मंत्र्यांची बैठक आज शहा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पुढील काळात कोणत्याही आपत्तीमध्ये एकाही नागरिकाचा जीव जाणार नाही, अशा उपाययोजना करण्यावर भर असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

अग्निशामक दलाच्या आधुनिकीकरणासाठी पाच हजार कोटी रुपयांचा निधी सर्व राज्यांना देण्यात येणार असून, राज्यातील पुणे, मुंबईसह चेन्नई, कोलकता, बंगळूर, अहमदाबाद, हैदराबाद या प्रमुख शहरांतील पूर नियंत्रणासाठी अडीच हजार कोटी आणि देशातील १७ राज्यांतील भूस्खलनावरील उपाययोजनांसाठी ८२५ कोटींचा केंद्र सरकारतर्फे निधी देणार असल्याचे शहा यांनी सांगितले.

राष्ट्रीय आपत्ती निवारण यंत्रणेने देशात अणुऊर्जा केंद्रे असलेल्या सात ठिकाणी भेट देऊन संबंधित राज्यांना सूचना केल्या आहेत. परिणामी, कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती उद्‍भवल्यास त्याचे निवारण करणे सोपे जाईल. अणुप्रकल्पांची उभारणी करताना आपत्ती निवारणाच्या उपाययोजनांची योग्यप्रकारे अंमलबजावणी करावी, त्यानंतरच वीजनिर्मिती सुरू करणे, अत्यंत आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

SCROLL FOR NEXT