Amit Shah  Sakal
देश

विरोधकांच्या बैठकीपूर्वी शाहांनी घोषित केला काँग्रेसचा पंतप्रधान पदाचा उमेदवार, विरोधकांमध्ये फूट पडणार?

Sandip Kapde

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी काँग्रेसचा पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केला आहे. मोदी सरकारच्या कारकिर्दीला ९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गुरुवारी एका जाहीर सभेला संबोधित करताना शाह यांनी जनतेला विचारले की २०२४ मध्ये पंतप्रधान कोण होणार, राहुल बाबा की नरेंद्र मोदी?. त्यामुळे काँग्रेसकडून पंतप्रधान पदासाठी राहुल गांधी उमेदवार असतील, असे शाह यांनी ठरवले आहे.

उद्या पाटणा येथे होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीपूर्वी अमित शाह यांनी एक प्रकारे २०२४ मध्ये पंतप्रधानपदासाठी मोदी-राहुल यांच्यात स्पर्धा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ही त्यांची राजकीय चाल असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे.

विरोधी पक्ष एका व्यासपीठावर एकत्र आले तरी पंतप्रधान पदाच्या उमेदवाराच्या  नावावरुन विरोधी पक्षात फूट पडू शकते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. विरोधी पक्षातील अनेक नेते पंतप्रधानपदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळेच शाह यांनी राहुल यांचे नाव घेतल्याचे मानले जात आहे.

यावेळी अमित शाह यांनी मोदी सरकारच्या कामांचा पाढा वाचला. मोदीजींनी ९ वर्षात देशाचा जगात आदर वाढवला आणि देशाची अर्थव्यवस्था जगात ११व्या वरून ५ व्या क्रमांकावर आणल्याचे शाह यांनी सांगितले.

१० वर्षे सत्तेत असलेल्या मनमोहन सरकारने घोटाळे आणि प्रचंड भ्रष्टाचार केला, तर मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही. काँग्रेसच्या राजवटीत देशात दहशतवादी घटना घडत असत, आमच्या जवानांचा शिरच्छेद केला जात असे. पाकिस्तानला त्याची सवय झाली होती.

अमित शाह म्हणाले, मोदी सरकार असताना त्यांनी काश्मीरमधील पुलवामा आणि उरीमध्ये हल्ले केले, ज्याला सरकारने चोख प्रत्युत्तर दिले. सरकारने काश्मीरमधून कलम ३७० हटवले, जे काँग्रेस सरकार ७० वर्षे हटवू शकले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT