Amit Shah Meeting on Amarnath Yatra esakal
देश

Amarnath Yatra: गृहमंत्री अमित शहांची उच्चस्तरीय बैठक

सकाळ डिजिटल टीम

अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी आज उच्चस्तरीय बैठक घेतली.

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी आज (मंगळवार) उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी अमरनाथ यात्रेच्या (Amarnath Yatra) पार्श्वभूमीवर सुरक्षेसंदर्भात आढावा घेण्यात आला. दोन वर्षांनंतर ही वार्षिक यात्रा 30 जूनपासून सुरू होत आहे. यंदा सुमारे तीन लाख भाविक या यात्रेत सहभागी होणार आहेत. दरम्यान, केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांनीही याच मुद्द्यावर नुकतीच बैठक घेतलीय. (Amit Shah Meeting on Amarnath Yatra)

गृहसचिव भल्ला यांनी आतापर्यंत अशा दोन बैठका घेतल्या आहेत. यापैकी एक 13 मे रोजी दिल्लीत आणि दुसरी जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) 15 एप्रिल रोजी घेण्यात आली. या बैठकीला जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला, इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख अरविंद कुमार, केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (CRPF) महासंचालक कुलदीप सिंह, जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंह यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, अमरनाथ बोर्डाचे (Shri Amarnathji Shrine Board 2022) सदस्यही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.

यावेळी अमित शहांना प्रवासी भागातील परिस्थिती आणि सुरक्षेशी संबंधित सर्व अपडेट्सची माहिती देण्यात आली. जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांत दहशतवाद्यांकडून टार्गेट किलिंगच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानं अमरनाथ यात्रा हे एक आव्हानात्मक काम आहे. या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयानं जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेल्या सुरक्षा यंत्रणांना सतर्क केलंय. विशेष म्हणजे, या यात्रेची ऑनलाइन नोंदणी 11 एप्रिलपासून सुरू झालीय. ही अमरनाथ यात्रा 43 दिवसांची असून ती 30 जून ते 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT