amit shah 
देश

'आम्हाला मत दिलं तर बेरोजगारी 40 टक्क्यांनी कमी करु' अमित शहा यांचं आश्वासन

सकाळवृत्तसेवा

पुदुच्चेरी : केंद्रीय गृह मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते अमित शहा आज पुदुच्चेरीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज कराईकलमध्ये एका निवडणुकीच्या सभेला संबोधित करताना बेरोजगारी निर्मूलनाचं आश्वासन दिलं आहे. विशेष म्हणजे अलिकडेच ट्विटरवर अनेक तरुणांनी बेरोजगारीच्या मुद्यावर आक्रोश व्यक्त केल्याने 'मोदी रोजगार दो' नावाचा एक हॅश्टॅग ट्रेंड झाला होता. त्यापार्श्वभूमीवर शहा यांचे हे विधान महत्त्वपूर्ण मानले जात आहे. 

यावेळी त्यांनी म्हटलंय की, जर तरुणांनी एनडीएला मतदान केलं तर त्यांचं सरकार केंद्र शासित प्रदेशातील बेरोजगारीचा दर 40 टक्क्यांनी कमी करेल. यावेळी शहा यांनी असाही आरोप केला आहे की, पुदुच्चेरीमध्ये आधीच्या काँग्रेस सरकारने केंद्र सरकारच्या योजनांच्या बाबतीत अत्यंत तुच्छ राजकारण केलं आहे. 

शहा यांनी म्हटलं की, पुदुच्चेरीमध्ये पुढील सरकार हे एनडीएचं होणार आहे. फक्त पुदुच्चेरीच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये सामील होत आहेत. कारण काँग्रेस पक्षामध्ये पात्रतेला काहीही किंमत दिली जात नाही. 

शहा यांनी काँग्रेसवर निशाणा साधत म्हटलं की, काही दिवसांपूर्वीच राहुल गांधींनी विचारलं होतं की, मत्स्य विभाग देशात का नाही आहे? मी लोंकाकडून जाणून घेऊ इच्छितो की त्यांना असा नेता हवाय का ज्याला हे देखील माहिती नाहीये की, मत्स्य विभाग गेल्या 2 वर्षांपासून देशात अस्तित्वात आहे. पुढे त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत म्हटलं की, हे काँग्रेसचे नेते सुट्टीवर होते तेंव्हाच केंद्रातील एनडीए सरकारने 2019 मध्ये या मंत्रालयाची स्थापना केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानने पेट्रोल-डिझेलच्या दरात केली कपात; किती रुपये लीटर दरानं मिळतंय इंधन?

Navi Mumbai: नवी मुंबईतील 'ही' स्थानकं मध्य रेल्वेच्या ताब्यात, प्रशासनाचा मोठा निर्णय; प्रवाशांचा फायदा होणार, कसा?

सामना जिंकूनही ऋषभ पंतवर IPL ची मोठी कारवाई! इतक्या लाखांचा ठोठावला दंड, नेमकं काय घडलं

Sharad Pawar Secret Meeting : शरद पवार गटाची गुप्त बैठक; पुण्यातील एका नामांकित हॉटेलमध्ये चर्चा, अजित पवार गटाचे काही आमदार संपर्कात?

Tech Tips : गाडी चालवताना येतो कटकट आवाज? लगेच चेक करून घ्या 'हा' पार्ट , नाहीतर होऊ शकतो मोठा अपघात

SCROLL FOR NEXT