Amit Shah esakal
देश

समान नागरी कायद्याबाबत अमित शहांचं मोठं विधान; म्हणाले, जे काही राहिलंय ते..

सकाळ डिजिटल टीम

राममंदिर, कलम 370, CAA आणि ट्रिपल तलाक सारखे मुद्दे आता संपले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी देशात लवकरच समान नागरी कायदा (Common Civil Code) लागू होऊ शकतो, असे संकेत दिलेत. भोपाळमध्ये भाजप नेत्यांच्या बैठकीत त्यांनी सांगितलं की, सीएए, राम मंदिर (Ram Temple), कलम ३७० आणि ट्रिपल तलाक यांसारख्या मुद्द्यांवर निर्णय झालाय. आता समान नागरी कायद्याची वेळ आलीय. याआधी त्यांनी राज्यातील ज्येष्ठ नेत्यांना विचारलं की, देशात सर्वकाही ठीक झालं काय? यानंतर त्यांनी समान नागरी कायद्याची चर्चा केली.

दरम्यान, पक्ष कार्यालयात कोअर कमिटी आणि प्रमुख नेत्यांसोबत अनौपचारिक बैठकीत शहांनी सांगितलं की, उत्तराखंडमध्ये हे पथदर्शी कार्यक्रमांतर्गत लागू केलं जात आहे. मसुदा तयार केला जात आहे. शिल्लक राहिलेलं काम योग्य पद्धतीनं पूर्ण केलं जाईल. मात्र, तुम्ही लोकांनी पक्षाला नुकसान होईल, असं कोणतंही काम करु नये, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

तत्पूर्वी शहांनी देशात सर्व काही ठीक झालं? असा प्रश्न राज्यातील वरिष्ठ नेत्यांना विचारला. यानंतर, त्यांनी कॉमन सिव्हिल कोड मुद्द्यावर चर्चा केली. एवढंच नाही, तर पुढील निवडणुकीपूर्वी राहुल गांधी काँग्रेसचे (Rahul Gandhi) अध्यक्ष होतील. पण, काळजी करण्याचं काही कारण नाही, काँग्रेसची आणखी दयनीय अवस्था होणार आहे. कसलंही आव्हान नाही, असंही शाह म्हणाले. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित होते. यानंतर, शाह BSF च्या विमानानं दिल्लीला परतले. यावेळी ज्योतिरादित्य शिंदे आणि खासदार राकेश सिंह देखील त्यांच्यासोबत गेले.

शहांची मोठ्या मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका

जातीयवाद देशाचं वास्तव आहे. या हिशोबानं प्रत्येक जातीच्या नेत्याला पद आणि महत्त्व द्यावं लागेल. मध्य प्रदेशमधील २०१८ च्या पराभवाबाबत शहा म्हणाले, विधानसभा निवडणूक भाजप हरली. मात्र, मतांचा टक्का जास्त होता. चुका झाल्या, त्याचा आढावाही घेतला. आता मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नानं जनमत वाढत आहे. या प्रयत्नांत संघटनेची भूमिका आवश्यक आहे. केवळ सरकारच्या कामांनी निवडणूक जिंकली जात नाही. बळकट संघटनाच निवडणूक जिंकून देईल, असंही शहांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT