america, prime minister narendra modi, amit shah  
देश

नरेंद्र मोदी स्वातंत्र भारताचे सर्वात यशस्वी पंतप्रधान : अमित शहा

त्यांनी देशात रामराज्य आणले.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वातंत्र भारताचे सर्वात यशस्वी पंतप्रधान असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काढले आहेत. त्यांनी देशात रामराज्य आणल्याचे ते म्हणाले. लोकांनी अगदी शांततेत मतदान करुन भाजपला सत्तेत आणले. तेही ३० वर्षानंतर स्पष्ट अशा बहुमताने, असे अमित शहा (Amit Shah) म्हणाले. राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) २० वर्षे झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात अमित शहा बोलत होते. १९६० नंतर, ते २०१४ पर्यंत लोक विचारत होते की ही बहुपक्षीय पद्धत किती दिवस चालेल? लोकांनी भाजपला मतदान केले आणि पहिल्यांदा बिगर काँग्रेस सरकार (Congress Party) पूर्ण बहुमताने सत्तेत आले. पंतप्रधान स्वतःला प्रधानसेवक म्हणून संबोधतात.

पंरतु मी म्हणालो की ते स्वातंत्र भारताचे सगळ्यात यशस्वी पंतप्रधान आहेत, असे शहा म्हणाले. आयोजक मला म्हणाले, की तुमच्याशिवाय मोदीजींना कोण ओळखतयं, मात्र ते चुकलेत. माझ्यापेक्षा देशातील जनता त्यांना चांगले प्रकारे जाणते. या प्रसंगी शहा यांनी मोदी यांच्या संघटनात्मक कौशल्यांची प्रशंसा केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नुकतेच चार दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर होते. त्यांनी तेथील जनतेशी संवाद साधला. तीन परिवारांनी काश्मीर खोऱ्याचा ७० वर्षांत विकास केला नाही. मोदींमुळे येथील लोकांना संधी मिळाल्याचे शहा म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mastani Lake Water Shortage : ऐतिहासिक मस्तानी तलावात यंदा निम्माच पाणीसाठा; कमी पावसामुळे वडकीवर टंचाईचे संकट, वन्यजीवांचे स्थलांतर वाढणार

IND vs PAK Final: वैभव-श्रेयस स्वस्तात परतले, पण अभिषेक-तिलकने डाव सावरला! शेवटच्या षटकांत धावांचा पाऊस; भारताची गाडी २०० पार

Mula Dam Wate : मुळा धरणाचे सर्व अकरा दरवाजे उघडले; नदीपात्रात २,५०० क्यूसेकने पाणी सोडले

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

Harnai Palande Beach Seagull : दापोलीच्या समुद्रकिनाऱ्यावर परदेशी पाहुण्यांचं आगमन! हर्णै-पाळंदेमध्ये झळकले 'सीगल' पक्षी, युरोपमधील वाढत्या तापमानाचा परिणाम?

SCROLL FOR NEXT