केंद्रीय गृहमंत्री अमित शहा  esakal
देश

'जम्मूतील लोकांवरील अन्याय संपला आहे, हे सांगण्यासाठी मी आलो'

आता या तीन परिवारांची दादागिरी चालणार नाही, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला आहे.

एएनआय वृत्तसंस्था

श्रीनगर : तीन कुटुंबांनी ७० वर्षांपर्यंत जम्मू-काश्मीरला काय दिले, असा निशाणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी पीडीपी, नॅशनल काॅन्फ्रन्स आणि काँग्रेस या तीन पक्षांवर साधला आहे. शहा हे सध्या जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते बोलत होते. शहा म्हणाले, की तीन कुटुंबांनी ७० वर्षांपर्यंत जम्मू-काश्मीरला काय दिले, ८७ आमदार, ६ खासदार. मोदींनी ३० हजार लोकांना निवडून आणण्याचे काम केले आहे. प्रत्येक गावांत पंचायतीची स्थापना करण्यात आली आहे. आता या तीन परिवारांची दादागिरी चालणार नाही, असा इशारा शहा यांनी दिला. कालपर्यंत (Narendra Modi) या तीन कुटुंबांतील सदस्य मला विचारत होते की काय देऊन जाणार नाही. मी तर हिशोब घेऊन आला आहे की काय देऊन जाणार आहे. मात्र ७० वर्षे तीन कुटुंबांनी जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) राज्य केले. तुम्ही काय दिले असा प्रतिप्रश्न गृहमंत्री अमित शहा यांनी विचारला.

जम्मूतील लोकांवरील अन्याय संपला आहे, हे सांगण्यासाठी मी जम्मूत आलो असल्याचे शहा यांनी सांगितले. आता तुमच्यावर कोणी अन्याय करु शकत नाही. येथे जो विकास युग सुरु आहे. त्यात अडथळा आणला जात आहे. मात्र विकास युगावर कोणताही परिणाम होणार नाही, असा आशावाद गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Census 2026 40 Questions List : जनगणनेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! अनुसूचित जाती-जमाती अन् विशिष्ट जातींची होणार नोंद; पाहा 40 प्रश्नांत काय?

Raj Thackeray : पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडीवरून राज ठाकरे संतापले; म्हणाले- ज्यांना सत्ता दिली त्यांनाच जाब विचारा

Sangli Miraj Expansion : कुठे वाढणार महापालिकेचा विस्तार? तीनही शहरांचे केंद्र बदलले; 'या' भागातील जमिनींचे भाव गगनाला भिडणार?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरणात राहुल गांधींना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाने कार्यवाही केली रद्द

Sangli Milk Collection Drop : FDA च्या धाडींमुळे सांगलीतील दुधाचा 'बनावट खेळ' बंद? तब्बल 78 हजार लिटरने दुधाची आवक घटली; पाहा आकडेवारी

SCROLL FOR NEXT