Amit Shah and Jay Shah 
देश

Video : अमित शहांनी कॅमेऱ्यासमोरच मुलाला झापलं? काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर करत दावा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमधील टीका-टिप्पणी सामान्य बाब आहे. अनेकदा एकमेकांचे विधान तोडून मोडून टीका करण्यात येते. याचा अनुभव काँग्रेसला आला असून राहुल गांधी यांचे अनेक विधाने अर्धवट घेऊन त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. आता काँग्रेस देखील याबाबत सक्रिय झाले आहे. भाजप नेत्यांचे विविध व्हिडीओ शेअर करत काँग्रेसकडून हल्लाबोल कऱण्यात येत आहे. (Amit Shah news in Marathi)

उत्तर प्रदेश काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर केंद्रीयमंत्री अमित शहा आणि त्यांचे पुत्र बीसीसीआयचे सचिव जय शहा यांना लक्ष्य करण्यात आले. काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. त्यामध्ये मंत्री अमित शहा आपले पुत्र जय शहा यांना रागावताना दिसत आहे. मात्र या व्हिडीओची सत्यता अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र अमित शहा संतप्त आहेत, हे यामध्ये दिसून येत.

व्हिडीओमध्ये दिसून येतं की, एका मंदिरात पुजा सुरू आहे. यावेळी अमित शहा हात जोडून उभे आहेत. त्याचवेळी जय शहा देखील तिथे उपस्थित दिसत आहे. दरम्यान मंत्रोच्चार सुरू असताना जय शहा यांचे लक्ष पुजेकडे नसल्याचे पाहून अमित शहा त्यांच्यावर रागवल्याचा दावा व्हिडीओमधून करण्यात आला आहे.

व्हिडीओमध्ये अमित शहा गुजराती भाषेतून ‘आमा ध्यान दे’ असं म्हणताना दिसतात. याचा अर्थ पुजेकडे लक्ष दे. त्यानंतर जय शहा पुजेकडे लक्ष देतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ शेअर करत काँग्रेसने लिहिले की, अमित शहा मुलाला म्हणतात, की पुजेकडे लक्ष दे. मुलाला खरोखर सनातन धर्माचे संस्कार दिले असते, तर रागवण्याची गरज पडली नसती, असा टोला काँग्रेसकडून लगावण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Mohol Ganeshotsav : मोहोळ शहरात गणेश मूर्ती खरेदीसाठी मोठी गर्दी, गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट गणेश मूर्तीच्या किमती वाढल्या

Marathi News Live Updates : मनोज जरांगे आझाद मैदानावर उपोषणावर ठाम; १८ सप्टेंबरसाठी पोलिसांकडे परवानगीचा अर्ज

Moon Venus Conjunction Sky Event: चंद्रकोरीसोबत तेजस्वी शुक्राची दुर्मीळ युती; निरभ्र आकाशात नयनरम्य खगोलीय नजारा

Pune News : महापालिकेचे अधिकाऱ्यांना उतरावे लागणार रस्त्यावर; दर शुक्रवारी अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT