amit shah is on tour of belgaum communication with activist in belgaum 
देश

डबल इंजिन जोडी प्रभावी ; कर्नाटकच्या मुख्यमंत्री बदलावर अमित शहांची प्रतिक्रिया

महेश काशिद

बेळगाव : देशात पंतप्रधान नरेंद्र आणि राज्यात मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांची डबल इंजिन जोडी प्रभावी ठरल्याचे गौरद्‌गार काढत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाबाबत सुरु असलेल्या चर्चेतील हवाच काढून घेतली आहे. तसेच मागील तालुका आणि जिल्हा पंचायत निडणुकीत पक्षाला 55 टक्के यश मिळाले होते. पण, यावेळी ते 75 टक्‍क्‍यावर न्यावे, असे आवाहनही त्यांनी दिले. 

भाजपतर्फे आयोजित जनसेवक मेळाव्याच्या समारोपात आज (ता.17) ते बोलत होते. कार्यकर्त्यांनी भरलेल्या जिल्हा क्रिडांगणावरील व्यासपीठावर शहा यांनी भाषण केले. भाषणात त्यांनी विरोधीपक्ष कॉंग्रेसवर चौफेर टीका केली. सोनिया गांधी आणि मनमोहनसिंग सरकारचा कार्यकाळ निष्क्रीय ठरली असल्याचेही ते म्हणाले. 

ते म्हणाले, 'ग्रामपंचायतीत पक्षाची उल्लेखनीय कामगिरी झाली आहे. विधानसभा, लोकसभा निवडणुकीत मतदारांनी पक्षाला भरगोस यश मिळवून दिले आहे. कार्यकर्त्यांचा हा नरेंद्र मोदी यांच्याप्रती दाखविलेला विश्‍वास आहे. देशाला स्वतंत्र मिळाल्यानंतर कोणीही काश्‍मिर प्रश्‍नाला स्पर्श केला नव्हता. पण, भाजपने दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर 375 कलम आणि 35 'अ' कलम रद्द केले. 

राममंदिर उभारणी कार्य सुरु केले. तलाख संदर्भात निर्णय घेतला. देशाच्या सीमा अधिक सुरक्षित केल्या. आतंकवाद्यांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईकचा हल्ला घडविला. विरोधक गरीबी निर्मुलनाचा नारा देत गरीबांना हटविले. पण, आम्ही त्यांना आधार दिला. त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी गॅस, वीज, शौचालय आणि घरे बांधली. आत्मनिर्भर योजनेचा नारा पंतप्रधानांनी दिला. ई - ग्रामपंचायत, ई - ब्रॉंडबण्ड सेवा जोडल्या. यामुळे युवकांना रोजगार मिळत आहे.

देशात मोदी आणि राज्यात येडियुराप्पा यांची कामगिरी उत्तम सुरु आहे. यापुढेही त्यांच्या नेतृत्वाखाली विकास अधिक रचनात्मक स्वरुपात घडेल. तालुका, जिल्हा पंचायत निवडणुकीत पक्षाला 55 टक्के मिळाले होते. ते आता 75 टक्के करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी राज्याध्यक्ष नलीनकुमार कटील, मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनीही भाषण केले.

कोरोनावरील लस सुरक्षित 

कोरोनावर विकसीत लस सुरक्षित आहे. पण, कॉंग्रेस त्याचा अपप्रचार करत आहे. त्यावर विश्‍वास ठेऊ नये. प्रत्येकांनी लस घेऊन देशाला कोरोनामुक्त बनवावे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.  

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: २ कोटींची सुपारी, आरोपींसोबत धनंजय मुंडेंचा संवाद...; मनोज जरांगेंनी थेट पुराव्याच्या ऑडिओ क्लिप ऐकवल्या

Thane News: 27 गावं तरी स्वतंत्र नगर परिषद नाही, आमदार-खासदार आक्रमक; कल्याण शीळ रोडवर सर्वपक्षीय आंदोलन

Dhananjay Munde: राज्यातल्या बड्या नेत्यांच्या गाड्यांमध्ये धनंजय मुंडेंनी मोबाईल लपवले? आरोपांवर स्वतःच दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल

Mosque Blast : 'जुमे की नमाज' सुरू असतानाच मशिदीत भीषण स्फोट; ५० पेक्षा अधिकजण जखमी

SCROLL FOR NEXT