गंगासागर - केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी जाहीर सभेद्वारे परिवर्तन यात्रेला प्रारंभ केला.
गंगासागर - केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी जाहीर सभेद्वारे परिवर्तन यात्रेला प्रारंभ केला. 
देश

‘तृणमूल’च्या गुंडांना तुरुंगांत डांबू : अमित शहा

वृत्तसंस्था

कोलकता - पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकाळात भाजपच्या १३० कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. राज्यामध्ये भाजपची सत्ता आली तर आम्ही या गुंडांचा शोध घेऊन त्यांना तुरुंगात डांबू, असे सूचक वक्तव्य गृहमंत्री अमित शहा यांनी आज येथील सभेत बोलताना केले. राज्याला अम्फान वादळाचा तडाखा बसल्यानंतर केंद्राने राज्याला मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत पाठविली होती पण यामध्येही गैरव्यवहार करण्यात आला, आता त्यांनाही तुरुंगात डांबण्यात येईल, असे शहा यांनी सांगितले.

‘दक्षिण-२४’ परगणा जिल्ह्यामध्ये नामकाहाना येथे आयोजित सभेत ते बोलत होते.  शहा यांच्या हस्ते यावेळी परिवर्तन यात्रेच्या पाचव्या आणि अखेरच्या टप्प्याला सुरुवात झाली. राज्यामध्ये वादळ आल्यानंतर केंद्राने मोठा निधी पाठविला होती पण तृणमूलच्या गुंडांनी तो खाऊन टाकला. भाजप सत्तेमध्ये आल्यानंतर या गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल आणि दोषींना तुरुंगांमध्ये डांबण्यात येईल, असे ते म्हणाले. ममता यांचे पुतणे अभिजित बॅनर्जी यांचा उल्लेख करताना अमित शहा यांनी दीदींना केवळ पुतण्याचे कल्याण करण्यातच रस असल्याचा आरोप त्यांनी केला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गंगासागरला भेट
अमित शहा यांनी आज गंगासागरला भेट देत आरती केली तसेच साधूसंतांशी देखील संवाद साधला. सत्तेत आल्यानंतर गंगासागराला सर्वांत मोठे तीर्थस्थळ बनवू असे आश्‍वासनही त्यांनी यावेळी दिले. 

नमामी गंगे या योजनेची राज्यामध्ये योग्यरितीने अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. आमचे सरकार आल्यानंतर त्यात सुधारणा करू असेही शहा यांनी स्पष्ट केले.

शहा म्हणाले

  • ममतादीदींना जय श्रीराम घोषणेचा राग
  • तृणमूलचे नेते लोकांना धमकावतात
  • ममता जनतेलाच नको
  • मच्छीमारांना वार्षिक सहा हजार रुपये देणार
  • बंगाली घुसखोरांना तृणमूलकडून आश्रय
  • दुर्गापुजेसाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते
  • सत्तेत आल्यास सातवा वेतन आयोग

सेवाश्रमचे कौतुक
शहा यांनी भारत सेवाश्रम संघाच्या कार्यालयास देखील भेट दिली.  आपण लहानपणापासूनच या संघाशी संबंधित आहोत, असे सांगताना शहा यांनी या आश्रमातील लोकांनी सेवेबाबतची जागरूकता वाढविल्याचा दावा केला. 

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sultanpur Lok Sabha Result: भाजपच्या गांधींना जोरदार धक्का, मनेका यांचा 37 हजार मतांनी पराभव

Maharashtra Lok Sabha Election Results Live : हातकणंगलेतून धैर्यशील माने 14723 मतांनी विजय; सत्यजीत पाटील-सरुडकर यांचा पराभव

Parbhani Constituency Lok Sabha Election Result: परभणीकरांनी जानकरांना दाखवला 'बाहेर'चा रस्ता; जाधवांची 'बॉस'गिरी कायम

Madha Constituency Lok Sabha Election Result: शरद पवारांनी भाजपला दाखवला कात्रजचा घाट! माढ्याचा गड धैर्यशील मोहिते पाटलांनी जिंकला!

Chhatrapati Sambhajinagar Constituency Lok Sabha Election Result: ना जलील ना खैरे ऑन्ली भूमरे, वादांच्या भोवऱ्यात अडकूनही शिंदे गटाने मिळवला मोठा विजय

SCROLL FOR NEXT