Navneet Rana 
देश

Navneet Rana: ' तुम्हाला 15 मिनिट पण आम्हाला फक्त 15 सेकंद लागतील...'; नवनीत राणांच्या वक्तव्यावरुन AIMIM आक्रमक

BJP candidate Navneet Rana: AIMIM या मुद्द्यावरुन आक्रमक झाली असून निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. AIMIM या मुद्द्यावरुन आक्रमक झाली असून निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली आहे. AIMIM चे प्रवक्ता वारिस पठाण यांनी म्हटलं की, लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान केलेल्या अशा वक्तव्यांमुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकते.

तेलंगणातील हैद्राबादमध्ये एका सभेत बोलताना राणा म्हणाल्या होत्या की, त्यांच्या छोट्या भावाने (अकबरुद्दीन ओवैसी) यांनी म्हटलं होतं की, ''१५ मिनिटांसाठी पोलीस हटवा मग पाहा आम्ही काय करतो. मला त्यांना सांगायचं आहे. त्यांना १५ मिनिट लागतील, पण आम्हाला १५ सेकंद लागतील. जर १५ मिनिटांसाठी पोलीस हटवले तर तुम्हाला कळणार देखील नाही कुठून आलो आणि कुठे गेलो. फक्त १५ सेकंद लागतील.''

राणा या भाजपच्या हैद्राबादच्या उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरलं आहे. याप्रकरणी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात राणा म्हणताना दिसत आहेत की, 'फक्त १५ सेकंद पोलीस हटवा, तुम्हाला कळणार देखील नाही, आम्ही कुठून आलो आणि कुठे गेलो.' राणा यांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी अकबरुद्दीन ओवैसी आणि असदुद्दीन ओवैसी यांना टॅग केलं आहे.

राणा यांच्या वक्तव्यानंतर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. वारिस पठाण यांनी यावर प्रत्युत्तर दिलंय. भाजपचे नेते निवडणुकीदरम्यान असे वक्तव्य करत आहेत. हे निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन आहे. आयोगाने त्यांच्यावर कारवाई करायला हवी. कारण, त्यांच्या या वक्तव्यामुळे दोन समूदायामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो, असं ते म्हणाले आहेत.

हैद्राबाद लोकसभा मतदारसंघामध्ये AIMIM चे असदुद्दीन ओवैसी विरुद्ध भाजपच्या उमेदवार माधवी लता यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ओवैसी हे हैद्राबाद लोकसभेचे प्रतिनिधीत्व करत आहेत. दुसरीकडे, माधवी लता यांनी त्यांच्या परीने जोर लावला आहे. दोघांमध्ये कोणाचा विजय होईल हे पाहण औत्सुक्याचं असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तानचं हे अती झालं! म्हणतात 'हंस्तादोलन' प्रकरणावर कारवाई करा अन्यथा UAE च्या लढतीवर बहिष्कार टाकतो...

Latest Marathi News Updates : आष्टीत पुरामुळे इमारतीवर अडकलेल्या साप्ते कुटुंबाचं हेलिकॉप्टरने रेस्क्यू

खूपच इमोशनल... प्रेक्षकांना कसा वाटला 'लपंडाव' मालिकेचा पहिला भाग? नेटकरी म्हणतात- रुपालीऐवजी दुसरी कुणी...

Crime: अनैसर्गिक कृत्य! २ तरुणांच्या गुप्तांगावर २३ वेळा स्टेपल अन् मिरचीचा स्प्रे...; जोडप्याचा कारनामा, भयंकर कारण समोर

Crime News : नाशिकमधील बेकायदा कॉल सेंटरवर सीबीआयची धाड; यूकेतील नागरिकांना गंडा

SCROLL FOR NEXT