Narendra Modi esakal
देश

Indian Post : 'हर घर तिरंगा मोहीम' यंदाही राहणार सुरू; पोस्ट खाते घरपोच देणार राष्ट्रध्वज, 'असे' करा बुकिंग

हर घर तिरंगा मोहिमेसाठी पोस्ट खात्याकडून विविध उपक्रम राबविण्यात येणार

सकाळ डिजिटल टीम

आपल्या तिरंगासमवेत फोटोही शेअर करता येणार आहेत. यावर्षीही पोस्ट खात्याकडे तिरंगा ध्वजाची मागणी अधिक आहे.

चिक्कोडी : स्वातंत्र्याच्या (Independence Day) अमृतमहोत्सवानिमित्त सुरू असलेली 'हर घर तिरंगा मोहीम' (Har Ghar Tiranga 2023) यंदाही सुरू राहणार आहे. त्यासाठी पोस्ट खात्याकडे राष्ट्रध्वजाची मागणी वाढत आहे.

गतवर्षी प्रचंड मागणी वाढल्याने पोस्ट खात्याने (Indian Post) या वर्षी ऑनलाईनद्वारे राष्ट्रध्वज मागणी केल्यास घरपोच सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाही हर घर तिरंगामुळे राष्ट्रध्वजाची मागणी वाढणार आहे. त्यासाठी पोस्ट खाते ऑनलाईन मागणी करणाऱ्या ग्राहकांना घरपोच ध्वज पोहचविणार आहे.

याशिवाय, हर घर तिरंगा मोहिमेसाठी पोस्ट खात्याकडून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये चिक्कोडी शहरात तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. प्रत्येक पोस्ट ऑफिसमध्ये हर घर तिरंगा बॅनर दिले जाणार आहे. त्या बॅनरवर स्कॅनर असून त्याद्वारे आपल्याला मागणी नोंदविता येणार आहे. याशिवाय त्या स्कॅनरवरून ऑनलाईन पोस्ट खात्याची माहितीही मिळणार आहे.

आपल्या तिरंगासमवेत फोटोही तेथे शेअर करता येणार आहेत. यावर्षीही पोस्ट खात्याकडे तिरंगा ध्वजाची मागणी अधिक आहे. पण, पुरवठा कमी असल्याने सध्या चिक्कोडी व अथणी या दोन मुख्य पोस्ट कार्यालयात त्याची विक्री करण्यात येत आहे. आणखी ध्वज येणार असल्याची माहिती पोस्ट खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली.

यावर्षीही २५ रूपये एका ध्वजासाठी आकारले जाणार आहेत. त्यामुळे यावर्षी ऑनलाईन ध्वज मागवून घेतल्यास ग्राहकांना सुलभ होईल, असे पोस्ट खात्याकडून आवाहन करण्यात येत आहे. यंदा १३ ते १५ ऑगस्टपर्यंत हा उपक्रम राबविला जाणार आहे.

Narendra Modi

यावेळी जास्तीतजास्त लोकांनी यात सहभाग नोंदवावा, यासाठी शहरात रॅली काढणे, सेल्फी पॉईंट सुरू करणे असे उपक्रम होतील. आवश्यकतेनुसार, प्रत्येकांनी पोस्ट खात्यात प्रत्यक्ष येण्यापेक्षा पोस्ट खात्याच्या वेबसाईटवरून ऑनलाईन तिरंगा मागविल्यास त्याच रकमेतून घरपोच तिरंगा पोहच होणार आहे. त्यासाठी कुठल्याही प्रकारचे वेगळे शुल्क आकारले जाणार नाही.

मुख्य कार्यालयात सेल्फी पॉईंट

पोस्ट खात्याकडून चिक्कोडीत सेल्फी पॉईंट सुरू केला जाणार आहे. त्यामध्ये येऊन तिरंगासमवेत फोटो घेऊन ते अपलोड करता येणार आहेत. ऑनलाईन पोस्ट खात्याकडून सेवा मिळणार असल्याने यावर्षी येऊन पोस्ट खात्यातून तिरंगा खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी होईल. पोस्ट खात्याकडून विविध उपक्रमाबाबत जागृतीही केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री तर बावनकुळे मुख्यमंत्री? स्वत: मंत्री बावनकुळेंनींच दिलं स्पष्टीकरण

NGO साठी सुवर्णसंधी! HCL Foundation देणार 24 कोटी रुपयांचे अनुदान; अर्ज प्रक्रिया सुरू, पाहा सविस्तर

Latest Marathi News Update: पालखी सोहळ्यात भाविकांचे लाखोंचे दागिने, मोबाईल चोरीस

Horoscope : उद्या बनतोय दुर्मिळ दशकीर्ती योग! 'या' 5 राशी होणार मालमाल; करिअर-व्यवसायात भरभराट, आरोग्याची मोठी समस्या होणार दूर

Mansoon Romance : दहावी, करिअर, गोंधळलेलं मन आणि ‘गारवा’ अल्बम...

SCROLL FOR NEXT