Amritpal Singh
Amritpal Singh 
देश

Amritpal Singh : तुमच्याकडे ८० हजार पोलिस, तरी अमृतपाल...; उच्च न्यायालयाने पंजाब सरकारला फटकारलं

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - अमृतपाल सिंह यांच्या शोधासाठी अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे. पंजाब पोलीस शनिवारपासून अमृतपालचा शोध घेत आहेत. दरम्यान, हे प्रकरण पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयात पोहोचले आहे. अमृतपाल पळून गेल्याबद्दल पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने पंजाब सरकारला फटकारले आहे.

अमृतपाल सिंग पळून गेल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला फटकारले. आपल्याकडे ८० हजार पोलिस आहेत, तरीही तुम्ही अमृतपालला अटक का करू शकला नाहीत, असा सवाल हरियाणा आणि पंजाब उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने पंजाबचे महाधिवक्ता विनोद घई यांना केला.

पंजाबचे महाधिवक्ता विनोद घई यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात सांगितले की, अमृतपाल सिंग याच्याविरोधात रासुका लावण्यात आला आहे. या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती एन.एस. शेखावत यांनी तो कसा पळून गेला, असा सवाल महाधिवक्ता विनोद घई यांना विचारला.

या प्रकरणातील इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. या उत्तरानंतर खंडपीठाने अमृतपाल सिंग वगळता सर्वांना अटक कशी झाली, असा सवाल केला. आपल्याकडे ८० हजार पोलिस आहेत. त्याला अटक कशी झाली नाही? जर तो पळून गेला तर ते गुप्तचर यंत्रणेचे अपयश असल्याचं न्यायालयाने म्हटलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro: पंतप्रधान मोदींच्या रोड शोसाठी मुंबईत मेट्रो बंद; सुरक्षेचे कारण देत घेतला निर्णय

Latest Marathi News Live Update: जागृतीनगर ते घाटकोपर दरम्यान सुरु असलेली मेट्रो संध्याकाळी 6 वाजल्यापासून बंद राहणार

India Head Coach : टीम इंडियाच्या मुख्य कोच निवडीबाबत मोठी अपडेट; राहुल द्रविडनंतर 'या' दिग्गज खेळाडूने अर्ज भरण्यास दिला नकार

DY Chandrachud: भारतातील न्यायालये लोकशाहीच्या चर्चेचे ठिकाण; ब्राझीलमधील J20 परिषदेत डी वाय चंद्रचूड यांचे स्पष्टीकरण

Vastu Tips: नवीन हॉटेल सुरू करताना कोणते नियम पाळावे, वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

SCROLL FOR NEXT