Amritsar Blast 
देश

Amritsar Blast: सुवर्ण मंदिराजवळ पुन्हा स्फोट, नवविवाहित जोडप्यासह पाच जणांना अटक

अमृतसर बुधवारी मध्यरात्री पुन्हा एकदा भीषण स्फोटाने हादरले

धनश्री ओतारी

अमृतसर बुधवारी मध्यरात्री पुन्हा एकदा भीषण स्फोटाने हादरले. हा सलग तिसरा स्फोट आहे. दरम्यान, गुरुवारी पंजाब पोलिसांनी तिन्ही बॉम्बस्फोटातील पाच आरोपींना अटक केली. यामध्ये एक नवविवाहित जोडपंदेखील आहे. या प्रकरणाचा तपास सातत्याने सुरू आहे. (Amritsar Blast)

गेल्या पाच दिवसांपासून पोलीस आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत होते. बुधवारी मध्यरात्री झालेल्या तिसऱ्या स्फोटानंतर पोलिसांना हे यश मिळाल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली आहे.

बुधवारी मध्यरात्री श्री हरिमंदिर साहिबजवळ झालेल्या स्फोटानंतर पोलिसांनी नवविवाहित जोडप्यासह पाच जणांना अटक केली आहे. हे जोडपे गुरुदासपूर येथील असल्याचे सांगितले जात आहे, मात्र पोलीस अधिकारी या प्रकरणाबाबत अधिक माहिती देण्यास टाळत आहेत. अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींच्या ताब्यातून स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.

आरोपींनी कॉरिडॉरच्या आवारात 12:12 वाजता श्री गुरु राम दास सराय यांच्या टॉयलेटमधून स्फोटक फेकले होते. स्फोटक जमिनीवर पडताच त्याचा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज आजूबाजूच्या दुकानदारांनी ऐकताच त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली, काही वेळातच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

तत्काळ तपास सुरू करण्यात आला. कारवाई करत पोलिसांनी नवविवाहित जोडप्याला सरायातील खोली क्रमांक 225 मधून अटक केली. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक चौकशीतच नवविवाहित जोडप्याने बॉम्बस्फोटाबाबत संपूर्ण प्रकरण सांगितले आहे. यानंतर पोलिसांनी त्याच्या इतर तीन साथीदारांना अटक केली. यादवच्या ताब्यातून दोन बॅग जप्त करण्यात आल्या आहेत.

एका आरोपीचे नाव अमरिक सिंग असे असून तो गाव दुगरी गुरुदासपूरचा रहिवासी आहे. ही ओळख आरोपीने आपल्या सराईत खोली घेताना सादर केलेल्या आधारकार्डवरून सांगितली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: अंगणवाडी सेविका आईच्या Gen Z लेकाने बदलले कुटुंबाचे नशीब; UPSCत ५७४ वा क्रमांक मिळवत झाला IPS, सर्व भावूक

‘आराधी आलाय नवा ग नवा’ ऐश्वर्या नारकर अन् तितीक्षा तावडेंचा धमाकेदार डान्स, नेटकरी म्हणाले... ‘एक स्वामिनी तर दुसरी दामिनी…’ Video

Rajya Sabha Candidates: राज्यसभा निवडणुकीत भाजपचा सस्पेन्स संपला; दोन राज्यांत उमेदवारांची घोषणा, कोण आहेत चेहरे? एक तर अभिनेत्री

PM Kisan: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएम किसानचा २४वा हप्ता कधी येणार? नवी अपडेट समोर

Prithviraj Chavan : ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देऊन चालणार नाही, तर त्यांना...; पृथ्वीराज चव्हाणांचे घणाघाती आरोप, फौजदारी कारवाईचीही मागणी

SCROLL FOR NEXT