Amul Milk Price Hike Esakal
देश

Amul Milk Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला झळ; अमूलने दुधाच्या दरात केली 'इतक्या' रूपयांची वाढ

Amul Milk Price Hike: एक लिटर अमूल गोल्डची किंमत ६६ रुपयांवरून ६८ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणारी बातमी समोर आली आहे. अमूलच्या दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. अमूल गोल्ड, अमूल शक्ती, अमूल टी स्पेशलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. लिटरमागे दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आज सकाळपासून अमूल दुधाचे नवे दर लागू झाले आहेत.

500 मिली अमूल म्हशीच्या दुधाचा दर 36 रुपयांपर्यंत वाढला आहे. त्याचवेळी 500 मिली अमूल गोल्ड दुधाचा दर 33 रुपयांवर पोहोचला असून अमूल शक्ती दुधाचा दर 30 रुपयांवर पोहोचला आहे.

एका लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?

मिळालेल्या माहितीनुसार, GCMMF ने रविवारी अधिकृतपणे नवीन किमती जाहीर केल्या आहेत. अमूल दुधाच्या दरात लिटरमागे २ रुपयांनी वाढ केल्याने सर्वसामानांच्या खिशावर भार पडू शकतो. अमूल दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ ३ जूनपासून लागू झाली आहे. 3 जून रोजी दूध खरेदीसाठी जाणाऱ्यांना प्रतिलिटर दोन रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. त्यामुळे अमूल गोल्डसाठी तुम्हाला ६६ रुपयांऐवजी ६८ रुपये मोजावे लागणार आहेत. अमूल ताजाची किंमत 54 रुपये प्रति लिटर आणि शक्तीची किंमत 60 रुपये प्रति लिटर आहे.

अमूल हा भारतातील एक मोठा ब्रँड

अमूल हे भारतातील घराघरात माहिती असलेले नाव आहे आहे. हा भारतातील सुपर ब्रँडपैकी एक आहे. एवढेच नाही तर भारतात 'श्वेतक्रांती' आणण्यातही अमूलचा मोठा वाटा आहे. त्याच्या यशामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर दुग्ध सहकारी संस्थांचा प्रसार झाला आणि राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाची स्थापना झाली.

अमूलचे दूध प्रत्येक घरापर्यंत पोहोचवले जाते मात्र या दुधाच्या वाढत्या दरामुळे गरीब व मध्यमवर्गीयांना फटका बसत आहे. बजेट विस्कळीत आहे. अमूलनेही दही दरात वाढ जाहीर केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमूलचे दूध गुजरातव्यतिरिक्त दिल्ली-एनसीआर, पश्चिम बंगाल आणि मुंबईच्या बाजारपेठांमध्ये पुरवले जाते. कंपनी एका दिवसात 150 लाख लिटरहून अधिक दुधाची विक्री करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: दुसऱ्या T20I सामन्यातील भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूर्यकुमारसोबत वाजलं? Viral Video मुळे चर्चेला उधाण

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Georai News : बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Parner News : वाळू वाहतुकदारास दंड करणा-या अधिकाऱ्यांकडूनच १५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT