Amul reduces prices on more than 700 products, offering major relief to consumers across India.

 

esakal

देश

Amul price cut News : ‘अमूल’ने घेतला मोठा निर्णय! तब्बल ७०० पेक्षा अधिक उत्पादनांच्या किंमतीत केली घट

Amul products price: आता नवीन किमती २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहेत ; जाणून घ्या, नेमका का घेतलाय हा निर्णय?

Mayur Ratnaparkhe

Amul price reduction : अमूल ब्रँड अंतर्गत दुग्धजन्य पदार्थांचे मार्केटिंग करणाऱ्या गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने शनिवारी मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार अमूलने आता बटर,तूप, आईस्क्रीम, फ्रोझन स्नॅक्ससह, बेकरी आणि तब्बल ७०० पेक्षा अधिक उत्पादनांच्या किरकोळ किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. 

तर कमी झालेल्या जीएसटी दरांचा फायदा ग्राहकांना देण्यासाठी कंपनीने हा किमती कमी करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. आता या नवीन किमती २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहे. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशननेएका निवेदनात म्हटले आहे की, ७०० हून अधिक उत्पादन पॅकच्या किंमत यादीत सुधारणा करण्यात आली आहे, ज्यामुळे ग्राहकांना जीएसटी कपातीचा पूर्ण फायदा मिळेल आणि हे बदल २२ सप्टेंबर पासून लागू होतील.

याशिवाय, हे बदल बटर, तूप, यूएचटी मिल्क, आईस्क्रीम, चीज, चॉकलेट, बेकरी रेंज, फ्रोझन डेअरी आणि बटाट्याचे स्नॅक्स, कंडेन्स्ड मिल्क, पीनट स्प्रेड, माल्ट-आधारित पेये आणि बरेच काही यासारख्या उत्पादन श्रेणींमध्ये करण्यात आले आहेत. अशी माहिती गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने दिली आहे.

नवीन किंमत किती? -

तुपाच्या किमती ४० रुपयांनी कमी होऊन ६१० रुपये प्रति लिटर झाल्या आहेत. बटरची (१०० ग्रॅम) किंमत ६२ रुपयांवरून ५८ रुपये करण्यात आली आहे. अमूल प्रोसेस्ड चीज ब्लॉकची (१ किलो) कमाल किरकोळ किंमत ३० रुपयांनी कमी होऊन ५४५ रुपये प्रति किलो झाली आहे. तर फ्रोझन पनीरची नवीन कमाल किरकोळ किंमत २२ सप्टेंबरपासून लागू होणारी ९९ रुपयांवरून ९५ रुपये होईल.

याशिवाय असंही म्हटले आहे की, "अमूलचा असा विश्वास आहे की किमती कमी केल्याने विविध दुग्धजन्य पदार्थांचा, विशेषतः आइस्क्रीम, चीज आणि बटरचा वापर वाढेल, कारण भारतात दरडोई वापर अजूनही खूप कमी आहे, ज्यामुळे वाढीच्या लक्षणीय संधी निर्माण होतील."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs BAN Live: बांगलादेशचा रोमहर्षक विजय; श्रीलंकेच्या जीवावर Super Four मध्ये पोहोचले अन् आज त्यांच्यावरच उलटले

Pune News : ‘बळकट लोकशाही हाच अंतर्गत सुरक्षेचा पाया’; सदानंद दाते

MHADA: 'म्हाडा'ची घरं स्वस्त होणार; किंमतींमध्ये होईल ८ ते १० टक्क्यांची घट

Thane News: ठाण्याच्या नो एंट्रीमुळे पनवेल कोंडीत! १८ तासांच्या बंदीने घुसमट, वाहतूकदारांना फटका

INDW vs AUSW : ७८१ धावांचा पाऊस! पण, स्मृती मानधनाचे विक्रमी शतक वाया; ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या वन डेसह जिंकली मालिका

SCROLL FOR NEXT