viral news sakal
देश

Video: 1000 रुपयांसाठी Ambulance driver ने Pregnant महिलेला सोडलं रस्त्यात

संतापजनक! रुग्णवाहिकाच्या चालकाने फक्त १००० रुपयांसाठी एका गर्भवती महिलेला भर रस्त्यात सोडल्याची घटना समोर आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

रुग्णवाहिका ही देवदूत सारखे काम करत अनेकदा कित्येकांचे प्राण वाचविते. पण नुकतेच एका रुग्णवाहिकाच्या चालकाने फक्त १००० रुपयांसाठी एका गर्भवती महिलेला भर रस्त्यात सोडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ माजवली. सध्या या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. (An ambulance driver in uttar pradesh left a pregnant woman on the side of the road as her family Fails To Pay 1000 rupees)

उत्तर प्रदेशच्या हरिमपूरमधील पंधरी गावातील ही घटना असून या व्हायरल व्हिडिओत गर्भवती महिलेला एका रुग्णवाहिकेने भर रस्त्यात सोडल्याचे दिसते. या महिलेला सोडून ही रुग्णवाहिका त्या ठिकाणहून पसार झाली. व्हिडिओत दिसते की तिला प्रचंड प्रसूती वेदना होत असून तिचे नातेवाईक तिला आधार देताना दिसत आहेत.

गर्भवती महिलेचे कुटूंब १००० रुपये देऊ शकले नाही म्हणून या रुग्णवाहिकेच्या चालकाने तिला भर रस्त्यात सोडले. या घटनेने एकच निषेध व्यक्त केला जात असून रुग्णवाहिका चालकावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

हा संतापजनक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत तीव्र रोष व्यक्त करीत आहे. या घटनेवर प्रशासनाने कठोर पावले उचलत संबंधित रुग्णवाहिकेच्या चालकावर त्वरीत कारवाई करण्याची मागणी नेटकरी करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT