'या' महिलेचं कसलं हे लग्नाचं व्यसन! स्वत:साठी शोधत आहे बारावा वर esakal
देश

'या' महिलेचं कसलं हे लग्नाचं व्यसन! स्वत:साठी शोधत आहे बारावा वर

'या' महिलेचं कसलं हे लग्नाचं व्यसन! स्वत:साठी शोधत आहे बारावा वर

सकाळ वृत्तसेवा

लोकांना असे वाटते, की लग्न एकदाच होते, म्हणून ते अविस्मरणीय बनवण्याचा खूप प्रयत्न करतात.

लग्नाचा (Marriage) क्षण हा आयुष्यातील सर्वांत अनोखा असतो. लोकांना असे वाटते, की लग्न एकदाच होते, म्हणून ते अविस्मरणीय बनवण्याचा खूप प्रयत्न करतात. पण लग्नाचे व्यसन जडलेली एक महिला पुढे आली आहे. सध्या ही महिला तिच्या बाराव्या वराच्या शोधात आहे. ही महिला आता अनेक लोकांच्या संपर्कात आहे, काही जण तिच्याशी लग्नाची बोलणीही करत आहेत.

वास्तविक, ही महिला अमेरिकेची (America) आहे. 'इनसाइडर'ने दिलेल्या ऑनलाइन रिपोर्टनुसार, मोनेट असे या 52 वर्षीय महिलेचे नाव आहे. नऊ वेगवेगळ्या पुरुषांशी 11 वेळा लग्न केलेली ही महिला आता पुन्हा नव्या जोडीदाराच्या शोधात आहे. ही महिला आता 52 वर्षांची झाली असली तरी ती अजूनही स्वत:साठी वराच्या शोधात आहे अन्‌ लग्नासाठी तिला काही प्रस्तावही आले आहेत.

रिपोर्टनुसार, महिलेने सांगितले की, जेव्हा ती लहान होती तेव्हा ती तिच्या भावाच्या मित्रांशी लग्न करण्याची कल्पना करत होती. मोनेटने हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर लगेचच पहिल्यांदा लग्न केले. त्यानंतर तिने नऊ वेगवेगळ्या पुरुषांशी 11 वेळा लग्न केले. पण यापैकी एकही विवाह फार काळ टिकू शकला नाही. आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणजे, तिचे एका पुरुषाशी दोनदा लग्न झाले आहे. सततच्या लग्नाच्या तुटण्यावर महिलेने सांगितले की, वारंवार होणाऱ्या लग्नामुळे ती निराश झाली नसून, आता तिला लग्नाचे व्यसनच लागले आहे.

तिच्या काही विवाहांचा संदर्भ देत महिलेने सांगितले की, तिचा पाचव्या क्रमांकाचा नवरा तिच्यासाठी सर्वोत्कृष्ट होता. सहा नंबरचा नवरा देखील खूप चांगल्या स्वभावाचा होता, म्हणून ती त्याच्याशी दोनदा लग्न केले. सध्या ही महिला एका पुरुषाला दोन वर्षांहून अधिक काळ डेट करत आहे, आता ती त्याच्याशी लग्न करणार आहे. गंमत म्हणजे या महिलेने या व्यक्तीशी यापूर्वी दोनदा लग्न केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT