An explosion at a wedding teddy bear An explosion at a wedding teddy bear
देश

लग्नात मिळालेल्या ‘टेडी बिअर’मध्ये स्फोट; तरुणाची प्रकृती चिंताजनक

सकाळ डिजिटल टीम

लग्नात नवदाम्पत्याला पुरस्काराच्या स्वरूपात ‘टेडी बिअर (teddy bear) मिळाले. पुरस्कार उघडत असता स्फोट झाला आणि नवविवाहित तरुणासह पुतण्या गंभीर जखमी झाला. दोघांनाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नवविवाहित तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील वांसडा तालुक्यातील मिठंबरी येथे घडली. लतेश गावीत असे गंभीर जखमी नवविवाहिताचे नाव आहे. (An explosion at a wedding teddy bear)

प्राप्त माहितीनुसार, लतेश गावीत आणि सलमा यांचा १२ मे रोजी विवाह झाला. लग्नात पाहुण्यांनी वधू-वरांना भेटवस्तू दिल्या. लतेशने फराळ करताना भेटवस्तू पाहण्यास सुरुवात केली. दरम्यान, भेट म्हणून आलेल्या टेडी बिअरमध्ये (teddy bear) स्फोट (explosion) झाला. या स्फोटात लतेशचा डोळा पूर्णपणे निकामी झाला. तर डाव्या हाताचे मनगट तुटले. तसेच शरीराचा वरचा भागही भाजला आहे. सोबतच तीन वर्षांचा पुतण्या गंभीर जखमी झाला.

जखमींना उपचारासाठी नवसारी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोबतच पुतण्या जियास पंकज याच्यावरही वांसदा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. सलमाच्या मोठ्या बहिणीचा माजी प्रियकर राजू धसनुख पटेल याने आशा वर्करला टेडी बिअरसारखे इलेक्ट्रॉनिक्स गिफ्ट पाठवले. लतेश लग्नात मिळालेल्या भेटवस्तू पाहत असतानाच मोठा स्फोट (explosion) झाला, असे लतेशच्या सासरच्यांनी सांगितले.

माजी प्रियकर संशयित

भेटवस्तू पाठवणारा राजू धनसुख पटेल हा संशयाच्या भोवऱ्यात आहे. राजू धनसुख पटेल याचे सलमासोबतही पूर्वी प्रेमसंबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र, तिने दुसऱ्या तरुणाशी लग्न केले. या रागातून राजूने हा गुन्हा केला आहे. सध्या वांसदा पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबीयांच्या जबाबाच्या आधारे तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISRO Successfully Tests: इस्रोची गगनयान मोहिमेसाठी यशस्वी इंटिग्रेटेड एअरड्रॉप चाचणी, चिनूक हेलिकॉप्टरने पाच टनाची कुपी सोडली

Chh. Sambhajinagar: सिडको खून प्रकरण, पालकमंत्री शिरसाट माघारी फिरताच एकाचे कृत्य; प्रमोदच्या काकूला धक्काबुक्की, कानशिलात लगावली

Healthy Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा 'बटाटा मटर ब्रेड कचोरी', सोपी आहे रेसिपी

Ajit Pawar: शेतकऱ्यांनी योग्य वेळी कर्जमाफी देऊ: उपमुख्यमंत्री अजित पवार; राष्‍ट्रवादीत अनिल देसाई दाखल, साताऱ्याच्या मातीशी आपुलकीची नाळ

Heavy Rain: देशभरात मुसळधार पाऊस; २४ तासांत १२ जणांचा मृत्यू, अनेक ठिकाणी पूर

SCROLL FOR NEXT