kanpur
kanpur esakal
देश

प्रेयसीच्या मैत्रिणीचा बनवला अश्लील व्हिडिओ, साथीदारांचा पोलिस स्टेशनला घेराव

सकाळ डिजिटल टीम

बजरंग दलाचा विद्यार्थी प्रमुख प्रिन्स श्रीवास्तव उर्फ ​​लाला याला सोमवारी रात्री कानपूरमध्ये अटक करण्यात आली आहे. तरुणीचा अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. याप्रकरणी पीडितेने एफआयआर दाखल केला आहे. विद्यार्थी प्रमुखाच्या सुटकेच्या मागणीसाठी घेरावासह जोरदार गदारोळ झाला. गोंधळ इतका वाढला की सर्कल फोर्ससह RRF बोलवावे लागले. त्यानंतर प्रकरण शांत झाले.(Blackmailing His Girlfriend's Friend By Making An Obscene Video, Bajrang Dal Created A Ruckus In Kakadev Police Station)

अमली पदार्थ देऊन बनवले अश्लील व्हिडिओ

प्रिन्स श्रीवास्तव उर्फ ​​लाला आणि त्याची गर्लफ्रेंड यांनी कट रचला. प्रिन्सने गर्लफ्रेंडच्या फ्रेंडला गुंगीचे औषध देऊन अश्लील व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.

त्या बदल्यात प्रिन्स आणि त्याची गर्लफ्रेंड रोज पैशांची मागणी करत. विरोध केल्यावर बेदम मारहाण करत. याला कंटाळून तिने ६ ऑगस्ट रोजी काकादेव पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ला, खंडणी, जीवे मारण्याची धमकी अशा गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

काकादेव पोलिसांनी सोमवारी रात्री प्रिंस लाला याला अटक केली. प्रिन्स सध्या बजरंग दलाचा विद्यार्थी प्रमुख आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी काकादेव पोलीस ठाणे गाठले. प्रिंस लालाच्या सुटकेची मागणी करत काकदेव पोलीस ठाण्याचा घेराव केल्याने मोठा गोंधळ उडाला.

वाद इतका वाढला की डीसीपी वेस्ट विजय ढुल, एसीपी स्वरूप नगर बृजनारायण सिंह आणि तीन पोलिस ठाण्यांचा फौजफाटा घटनास्थळी पोहोचला. तरीही त्यावर नियंत्रण आले नाही, त्यामुळे आरआरएफ बोलावण्यात आले. त्यानंतर हा गोंधळ शांत झाला. रात्री उशिरापर्यंत बजरंग दलाचे अधिकारी आणि पोलिस अधिकारी यांच्यात चकमक सुरू होती. हा गोंधळ पाहून पोलिसांनी आरोपी प्रिन्सला दुसऱ्या पोलीस ठाण्यात हलवले.

प्रिंस लालावर पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत

एसीपी स्वरूप नगर बृजनारायण यांनी सांगितले की, आरोपी प्रिन्स लालाविरुद्ध गंभीर कलमांतर्गत पाच गुन्हे दाखल आहेत. याआधीही त्यांनी पेट्रोल पंपावर मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतरही त्याच्या कारवाया थांबल्या नाहीत. तरुणीने एफआयआर दाखल केला असून, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला मंगळवारी कोर्टात हजर करून कारागृहात पाठवण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT