Nupur Sharma and SC
Nupur Sharma and SC 
देश

नुपूर शर्मांना फटकारणाऱ्या SC बेंचवर 15 निवृत्त न्यायाधिशांचा आक्षेप

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयात नुपूर शर्माच्या खटल्याची सुनावणी करताना न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जेबी पारडीवाला यांच्या बेंचने याचिकाकर्त्यांना फटकारले होते. तसेच महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या बेंचने या प्रकरणावर नोंदवलेल्या निरीक्षणावर 117 दिग्गज व्यक्तींनी आक्षेप नोंदवला आहे. यामध्ये 15 निवृत्त न्यायाधीशांचा देखील समावेश आहे. (open letter to CJI NV Ramana)

भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांना गेल्या आठवड्यात भडकावू वक्तव्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने फटकारले होते. या विरोधात आता देशातील 117 सेलिब्रेटींनी खुले पत्र प्रसिद्ध करून सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीवर आक्षेप घेतला आहे. या सेलिब्रेटींमध्ये 15 निवृत्त न्यायाधीश, 77 निवृत्त नोकरशहा आणि 25 निवृत्त सशस्त्र दलाचे अधिकारी अशा एकूण 117 जणांचा समावेश आहे.

या सर्वांनी स्वाक्षरी करून जारी केलेल्या निवेदनात म्हटलं की, माननीय सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या मूलभूत अधिकाराचे संरक्षण करण्याऐवजी, याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. तसेच याचिकाकर्त्याला याचिका मागे घेण्यास भाग पाडले आणि योग्य मंचाकडे (उच्च न्यायालय) जाण्यास सांगितलं. तेही सुनावणी दुसऱीकडे पाठविण्याचे उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नसताना.

निलंबित करण्यात आलेल्या भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वतीने सुप्रीम कोर्टातील सर्व याचिका वर्ग करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मा यांना फटकारले होते. उदयपूरमधील कन्हैयालालच्या हत्येसाठी नुपूरने पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी केलेले वक्तव्य कारणीभूत असल्याचे न्यायालयाने सुनावणीदरम्यान सांगितले. तसेच नुपूर शर्माच्या वक्तव्यामुळे देशभरात हिंसाचार भडकला. देशात जे काही घडत आहे त्याला एकटी नुपूर शर्मा जबाबदार असून त्यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी, असं न्यायलयाने म्हटलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT